पूर्व हवेली तालुका समिती अध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड यांची निवड
पूर्व हवेली तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड तर उपाध्यक्षपदी सुभाष काळभोर यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ अध्यक्ष अरुणजी रोडे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी फेस कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश कुंजीर पाटील, पार्क युनि फिनिया सीनियर जेष्ठ नागरिक संघाचे विठ्ठल परब, शतय जेष्ठ नागरिक संघ मोहम्मदवाडी संघाचे एम कोंढाळकर, निर्मल जेष्ठ नागरिक संघाचे कैलास थोरात, अमृतेश्वर जेष्ठ नागरिक संघ केशवनगर मुंडवा संघाचे नंदकिशोर मोरे, चिंतामणी ज्येष्ठ नागरिक संघाचे किसन गायकवाड, मांजरी हायवे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सौ.रंजनाताई बर्गे, शिवाजीराव माळी जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ वडकी, शिवाजी आंबेकर, तसेच आनंद तुकाराम गायकवाड, सुदाम मदने व इतर मान्यवर उपस्थित होते.