NEWS

पुरणपोळ्यांसाठी प्रसिद्ध नाव “भास्कर पुरणपोळी घर” आता पुण्यात देखील

Share Post

अप्रतिम चवीच्या पुरणपोळ्यांसाठी प्रसिद्ध नाव भास्कर पुरणपोळी घर ने आज नायारण पेठेत पत्र्या मारुती चौकाजवळ आपले पहिले स्टोअर सुरू करून पुणे शहरातील रहिवाशांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. ठाणे, कांदिवली आणि कल्याण मध्ये मुंबईकरांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर हा ब्रँड आता पुणेकरांच्या देखील नक्कीच पसंतीस उतरेल. पुणे येथील या आऊटलेटचा शुभारंभ आकाश ओवळेकर (पुणे फ्रँचायझीचे मालक ), प्रमुख अतिथी – विठ्ठल शेट्टी , ब्रँडचे मालक भास्कर व इतर मान्यवर, पाहुणे आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

भास्कर पुरणपोळी घर हे बीपीजी युनिकॉर्न एलएलपीच्या मालकीचे आहे, ज्यांना फूड,ऑपरेशन्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीजमध्ये २० ते २५ वर्षांचा अनुभव आहे. २०२१ मध्ये ठाण्यातील पहिल्या आउटलेटसह सुरू झालेल्या या ब्रॅंण्ड मधील २४ हून अधिक पुरणपोळीच्या प्रकारांचा आस्वाद आजतगायत ३ लाखांहून अधिक ग्राहकांनी घेतला आहे. येथे २४ हून अधिक प्रकारच्या अस्सल पुरणपोळ्या आहेत ज्या फ्रेश व नैसर्गिक पद्धतीने तयार केल्या जातात, यात कोणतेही केमीकल, प्रिझरवेटिव्ह किंवा पल्प वापरला जात नही आणि ह्या पुरणपोळ्या १०० टक्के नॅचरल आणि फ्रेश असतात. यावेळी बोलताना आकाश ओवळेकर – पुणे आउटलेटचे फ्रँचायझी मालक म्हणाले, “पुरणपोळी ही महाराष्ट्रीयन गोडातील मुख्य पर्दार्थांपैकी एक आहे आणि मला या ग्रुपशी जोडले गेल्याबद्दल आणि पुणे शहरातील रहिवाशांसाठी आउटलेट उघडताना खूप आनंद होत आहे. आजच्या आधुनिक जगात महाराष्ट्राची मूळ संस्कृती परत आणणे ही आमची मूळ संकल्पना आहे. आमच्या आउटलेटमध्ये आम्ही ताज्या पुरणपोळ्या तयार करतो ज्या आमच्या स्टोअरमध्ये खाता येतील किंवा टेकअवे म्हणून देखील नेता येतील. पुरणपोळी सोबतच आमच्याकडे मसाल्याचे पदार्थ, मिठाई, मसाले आणि लोणची आणि अतिशय प्रसिद्ध असे उकडीचे मोदक हे अतिरिक्त प्रकार देखील आहेत.” ते पुढे म्हणाले मी स्वत: महाराष्ट्रीयन असल्यामुळे मी विविध प्रसंगी आणि सणांमध्ये पुरणपोळी खातच मोठा झाले आहे आणि पुरणपोळी ही माझ्या आवडत्या महाराष्ट्रीयन गोड पर्दार्थांपैकी एक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *