20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पुण्यात MG Comet EV लाँच किंमत ७.९८ लाखांपासून सुरू

Share Post

MG Comet EV, अर्थात मोबिलिटी साठी नवीन सोल्युशन
MG Motors, इंडिया ने पुण्यातील बी. यू. भंडारी शोरूमद्वारे आपली दुसरी इलेक्ट्रिक कार MG Comet EV लाँच केली आहे. ही आत्ताच्या घडीला सर्वात वाजवी किमतीत उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक कार ठरली आहे. या EV मध्ये १७.३ kwh बॅटरीची क्षमता असून, याची इलेक्ट्रिक मोटर ४२ Ps पावर आणि ११० Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार ह्या EV Comet ची रेंज २३०km आहे. सध्या पुण्यात ही कार ७.९८ लाख ह्या प्रास्ताविक किमतीत लाँच झाली आहे. आता पुण्यातील बी. यू. भांडारीच्या वाकड व कॅम्पमधील शोरुम ला ह्या कारसाठी भेट देता येईल.

स्मार्ट, एंटरटेनिंग आणि टोटल पॅकेजिंग असलेली ही कार तुम्हाला मित्र, प्रियजन आणि कुटुंबासोबत आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देईल. सर्व सुविधांनी युक्त अशी ही आलीशान ईव्ही कार कम्फर्ट साठी देखील तितकीच सक्षम आहे. यातील ए ४ सीटर स्प्लिट सीटसह, पुढील आणि मागील बाजूस फ्रन्ट आणि रेअर एक्स्ट्रा लेग रूम, इनसाईड इन्टरनेट, ॲपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि अशा अनेक स्मार्ट EV वैशिष्ट्यांसह तुम्ही नेहमीच कनेक्टेड राहू शकता आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेऊ शकता.

ही आलिशान कार, प्रशस्त इंटेरियर आणि आरामदायी व उच्च दर्जाच्या सुविधांसह तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. एमजी कॉमेट ईव्ही आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांसह तुमच्या जीवणातील प्रवासाचा भाग अधिक सोपा बनवते.

MG Comet EV मध्ये तुम्ही तुमची स्टाईल शोधू शकता. २५०हून अधिक स्टिकर्स कॉम्बिनेशनस्, ग्राफिटी आणि आणखी बऱ्याच ऑप्शन्स मधून स्वतः निवडा आणि झिप करा. MG Comet EV चालवणे हे चीझ बर्स्ट पिझ्झा खरेदी करण्यापेक्षा ही सोप्पे आहे.

एमजी कॉमेट ईव्हीची काही स्मार्ट वैशिष्ट्ये- कार जंक्शनसाठी व्हॉइस कमांड, एसी ऑन/ऑफ रेडिओ, रिमेनिगं मायलेज, चिट चॅट व्हॉईस इंटरॲक्शन, ३०+ हिंग्लिश व्हॉइस कमांड, वेदर व्हॉईस कमांड, क्रिकेट, कॅल्क्युलेटर, घड्याळ, तारीख/दिवसाचे हॉरस्कॉप, डिक्शनरी, न्यूज आणि नॉलेज, होम स्क्रीन मल्टीपल पेजेसहर विजेट कस्टमायझेशन, थीम डाउनलोड करण्यासाठी कस्टमायजेबल लॉक स्क्रीन वॉलपेपर थीम स्टोअर, ब्राइटनेस सिंक फंक्शन (इन्फोटेनमेंट आणि क्लस्टरसाठी), हेड युनिटवर वाढदिवसाच्या शुभेच्छा (कस्टमायजेबल तारखांच्या पर्यायासह), इन्फोटेनमेंटवर चार्जिंग डिटेल्स, इन्फोटेनमेंटवर जास्तीत जास्त वेगासाठीच्या सेटिंग (३० ते ८० km पर्यंत), ऑनलाइन म्युजीक अॅप, की शोरिंग फंक्शनसह डिजिटल की, ऑडिओ. एसी ऑन ऑफ कार रिमोट कंट्रोलसाठी स्मार्ट अॅप, लाइव्ह लोकेशन शेअरिंग आणि ट्रॅकिंग, अॅप्रोच अनलॉक फंक्शन, रिमोट कार लॉक/अनलॉक, फाईंड माय कार अॅपवर व्हेईकल स्टेटस चेक ऑन अॅप, व्हेईकल स्टार्ट अलार्म, जिओ-फेन्स, व्हेईकल ओवरस्पीड अलर्ट सह कस्टामाईजेबल स्पीड लीमीट, स्मार्ट ड्राइव्ह इन्फरमेशन, चार्जिंग स्टेशन सर्च, आय-स्मार्ट अॅपवर १०० % चार्जिंग नोटिफिकेशन्स, स्मार्टवॉचसाठी स्मार्ट अॅप”, क्रिटीकल टायर प्रेशर व्हॉइस अलर्ट, इग्निशन ऑन असताना लो बॅटरी अलर्ट (१२ व्ही आणि ईव्ही, दोन्ही बॅटरीसाठी), ई- कॉल (सुरक्षेसाठी), कॉल (सोयीसाठी), वाय-फाय कनेक्टिव्हिटी (होम वाय-फाय/मोबाइल हॉटस्पॉट), ओव्हर द एअर (ओटीए) अपडेट्स, प्रीलोडेड ग्रीटिंग मेसेज ऑन एंट्री (कस्टमाईज्ड मेसेज ऑप्शनसह), डिप्रेचर “गुड बाय ” मेसेज ऑन एक्झीट,ईकोट्री- CO2 इन्फोटेनमेंट आणि आय स्मार्ट अॅपवर सेव्ह डेटा.

हे सर्वकाही आता फक्त ७. ९८ लाखांच्या या प्रास्ताविक किमतीत मिळवण्यासाठी बी यू भंडारीच्या पुण्यातील वाकड आणि कॅम्पमधील शोरूमला भेट द्या.