23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पुण्यात रॉयल कॅनिन कडून पूना केनेल क्लबसोबत सहयोगाने डॉग शोचे आयोजन

Share Post

रॉयल कॅनिनने पूना केनेल असोसिएशनसोबत संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर पोलिस ग्राउंड, पुणे येथे वार्षिक डॉग शो चे आयोजन शिवाजी नगर पोलीस ग्राऊंडवर करण्यात आले . दोन दिवस चालणारा हा कार्यक्रम गोल्डन रिट्रीव्हर, बीगल इत्यादी सर्व जातींसाठी गटांमध्ये विभागला गेला आहे, जवळपास १३० प्रदर्शक, ३८० कुत्र्यांनी सहभाग आणि २० हून अधिक जातीच्या श्‍वान विविध पदांसाठी स्‍पर्धा करतील. श्वानांचे आंतरराष्ट्रीय ज्युरी, गोल्डन रिट्रीव्हर शोसाठी जपानचे श्री. हितोशी सायमा आणि बीगल जातीसाठी सर्बियाचे श्री. पीटर फिरिक यांच्याकडून परीक्षण केले जाईल. विजेत्या श्‍वानाला ‘बेस्ट इन शो’ टायटलसह पुरस्‍कारित करण्‍यात येईल.

रॉयल कॅनिन, इंडियाचे पेट प्रोफेशनल्‍स डायरेक्टर श्री. श्रीकांत रामास्‍वामी म्‍हणाले, “रॉयल केनिनमध्‍ये आमचा विश्‍वास आहे की, पाळीव प्राणी आपले जग चांगले बनवतात आणि पाळीव प्राण्यांसाठी एक चांगले जग बनवणे हा आमचा उद्देश आहे. आम्ही व्यावसायिक ब्रीडर्सना पाठिंबा देतो, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचे आरोग्यांवर लक्ष केंद्रित करतात. आमचा विश्वास आहे की, ब्रीडिंग या व्‍यवसायाला विशिष्ट ज्ञान आणि कौशल्य आवश्यक आहे. पूना केनेल क्‍लबचे श्री. संजय देसाई म्‍हणाले की आम्‍हाला रॉयल केनिनसोबत सहयोगाने हा इव्‍हेण्‍ट आयोजित करण्‍याचा आनंद होत आहे. कुत्रे जबाबदार मालकांसोबत निरोगी, आनंदी जीवन जगतात याची खात्री घेण्‍याचा आणि या उद्देशासाठी काम करणार्‍या व्‍यक्‍तींना प्रशंसित करण्‍याचा आमचा उद्देश आहे. आमच्या डॉग शोच्या माध्यमातून आम्ही जातीचे ज्ञान आणि शिक्षण वाढवण्यावर भर देणार आहोत. आमच्‍या क्‍लबचा जाती/वैयक्तिक कुत्र्याची वैशिष्ट्ये, ब्रीडिंग, विक्री आणि कुत्र्याची पिल्ले/कुत्र्यांचे घर याविषयी अचूक माहिती देऊन जातीची मानके राखण्यावर विश्वास आहे.