पुण्यात रंग-ए-मेहफिलचे आयोजन.
गझल आणि भारतीय उप-शास्त्रीय संगीताचे युग पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न दिल्लीच्या अरविंद संगीत स्पेक्ट्रम संस्थेतर्फे केला जात आहॆ. गायना बरोबरच निरनिराळी वाद्य परंपरा रसिकां समोर आणण्याचा उद्देश संस्थेचा असून गायन-वादनाचे कार्यक्रम संस्थे तर्फे आयोजित केले जातात. पुण्यात येत्या ४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी ५ वाजता रंग-ए-मेहफिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि झज्जर घराण्याच्या ९व्या पिढीचे गायक अली हुसेन यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, मैफिली चे हे दुसरे पर्व असून अरविंद संगीत स्पेक्ट्रमची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात रसिकांना विविध काव्य रचना, पारंपरिक आणि उर्दू हिंदी फिल्मी आणि गैर-फिल्मी गझल तबला, सारंगी, हार्मोनिअम आणि अशा अनेक पारंपारिक वाद्यांच्या साथ संगती सह आस्वाद घेता येणार आहॆ. गझल आणि शायरी चे सुमधुर सादरीकरण आणि विविध शास्त्रीय वाद्यांची साथ संगत असे गायन-वादनाचे एकत्रित सौंदर्य अनुभवता येणार आहे. गझल च्या बाबतीत लोकांच्या मनात गैरसमज आहेत. गझल म्हणजे खूप अवघड शब्द रचना किंवा दुःखी भावना व्यक्त करणारे काव्य. पण असे नाही. गझल चे खूप विविध प्रकार आहेत जे जीवित ठेवणे गरजेचे आहॆ.
रंग-ए-मेहफिल गझल-संध्ये मध्ये गायक अली हुसैन आणि मधुरा दातार युवा तबलावादक आणि अरविंद म्युझिक स्पेक्ट्रमचे संस्थापक अरविंद यांच्यासोबत गझल पेश करणार असून त्यांना गिटार – अर्शद अहमद, हार्मोनियम – विशाल धुमाळ, सारंगी – संगीत मिश्रा, कीबोर्ड – केदार परांजपे आणि रिदम मशिन – रोहित जाधव यांची साथ संगत लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायरा अली हुसैन
करणार आहेत.