पुण्यात भारतातील पहिल्या अभिनव हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस सेंटरचे उद्घाटन
पाश्चिमात्य देशात हार्मोन रिप्लेसमेंट, थेरपी सेंटरचे प्रमाण मोठे आहे. पण भारतात आजही ठराविक उपचार वगळता इतर ग्रंथीच्या आजारांवर पारंपरिक पद्धतीनेच उपचार केले जातात. मात्र, काळाची गरज ओळखून आता पुण्यात भारतातील पहिल्या हार्मोन हब(हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस क्लिनिक) चे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी हार्मोन वेलनेस क्लिनिक्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश ब्राम्हणकर, डॉ विक्रम डोसी (संचालक), डॉ. सूरज कोडक (एम डी) संचालक, डॉ नुपूर काळे – उमराणीकर (स्त्रीरोग तज्ञ) डॉ पियुष लोढा (डी एम एंडोक्रिनोलॉजी), डॉ. मुकेश बुधवाणी (एम डी) फेलोशिप साइको-सेक्शुअल मेडिसिन, डॉ राकेश नेवे (ज्येष्ठ कर्करोग तज्ञ), आहारतज्ञ डॉ अनूज गावंडे, हिंदुस्थानी क्लासिकल पंडीत पुष्कर लेले आणि म्यूजिक थेरपी तज्ञ डॉ शुभम कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाल्या, हार्मोन रिप्लेसमेंट ही एक आधुनिक उपचार पद्धत आहे. या बद्दल ऐकताना एखाद्या फिक्शन् फिल्म प्रमाणे वाटतय. मात्र हार्मोन रिप्लेसमेंट ही एक परवडू शकेल अशी उपचार पद्धत आहे, यातून रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात, आणि यांचा सक्सेस रेट खूप चांगला आहे, हे बघून या अभिनव उपक्रमाचा मी भाग झाले यांचा अतिशय आनंद वाटतो.
हार्मोन हब विषयी बोलताना हार्मोन वेलनेस क्लिनिक्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश ब्राम्हणकर म्हणाले, हार्मोन हब म्हणजेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि वेलनेस सेंटर ही एक अशी अभिनव संकल्पना आहे की, ज्यात आपल्या हार्मोन्स च्या समस्यांवर तज्ञाकडून एलोपथीं उपचार तर होतीलच, परंतु त्यासोबत म्युझिक थेरपी,प्राणिक हिलिंग,कौन्सेलिंग प्रोग्राम्स,आहाराचा सल्ला तसेच लाइफ कोचिंग आदि वैविध्यपूर्ण दृष्टीकोनातून रुग्णाचा सर्वांगीण उपचार केला जाईल.