17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पुण्यात पहिल्यांदाच महानाट्या मधून उलगडणार श्री बालाजींचा इतिहास 

Share Post

गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने  महानाट्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यामध्ये अतिशय भव्यदिव्य असे  ‘श्री बालाजी महानाट्य – इतिहास, लीला आणि समर्पण’ आयोजित करण्यात येत आहे. या हिंदी महानाट्याचे सादरीकरण भव्य अशा 5 मजली रंगमंचावर होणार आहे. तर यामधील 250 कलाकार, 70 हून अधिक नृत्य कलावंत, घोडे, रोबोटिक हत्ती हे या महानाट्याचे खास आकर्षण असणार आहे. या महानाट्यातून उभारला जाणार निधी मंदिर निर्माण आणि अन्य सामाजिक उपक्रमांसाठी दिला जाणार आहे, अशी माहिती या महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक विशाल दीपक धुमावत आणि ॲड. सनी रवींद्र कोळपकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विशाल धुमावत म्हणाले की,  गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच श्री बालाजींचा इतिहास उलगडवून दाखवणारे महानाट्य सादर होणार आहे.  हे महानाट्य चोरडिया कॉर्नर, शांती नगर, कोंढवा येथील मैदानावर 8 ते 11 फेब्रुवारी असे 4 दिवस सायंकाळी 5 वा.  सादर होणार आहे. या महानाट्यासाठी  120 फुट लांब आणि 60 फुट ऊंच असा अतिभव्य पाच मजली रंगमंच उभारण्यात आला आहे. तसेच यात प्रत्यक्ष घोड्यांचा रंगमंचावर वावर असणार आहे, याशिवाय नाटकांच्या इतिहासात पहिल्यांदाच रोबोटिक हत्ती देखील वापरण्यात येणार आहेत. 

‘श्री बालाजी महानाट्य – इतिहास, लीला आणि समर्पण’ या महानाट्याचा शुभारंभ 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्री त्रिदंडी श्रीमन्नारायण रामानुज चिन्ना जेयर स्वामी, इस्कॉनच्या गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध प.पू. इंद्रद्युम्न स्वामी महाराज. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप नेते, आमदार श्रीकांत भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.