NEWS

पुण्यात क्राफ्टरूट्स प्रदर्शनीचे आयोजन (२ ते ६ फेब्रुवारी पर्यंत )

Share Post

कलाकारांच्या अनोख्या कलागुणांना प्रोहत्साहन देत, देशाच्या विविध भागातील खास कलेला जगासमोर आणुण या कालाकारांना मदद करने हे आपले समाजिक दायित्व आहे, आणि आम्ही यासाठी निरंतर प्रयत्नशील आहोत, असे विचार आनंदीबेन पटेल(उत्तर प्रदेश राज्यपाल) यांनी व्यक्त केले, आज पुण्यात सुरू झालेल्या क्राफ्टरूट्स प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की कलाकारांना शहरी लोकांशी जोडणे हेच आमचे काम आहे, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळुण ते सक्षम व सबळ होतील, यावेळी दीपक वसंतराव केसरकर ( शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र ) देखील उपस्थित होते. क्राफ्टरूट्स हा ग्रामश्री महिला सक्षमीकरण एक उपक्रम आहे. ज्याची स्थापना उत्तर प्रदेशच्या माननीय राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि प्रगल्भ सामाजिक उद्योजिका अनारबेन पटेल यांनी केली आहे. भारतीय कारागिरांचे जीवन समृद्ध करण्यासाठी (ज्यामध्ये बहुसंख्य महिला आहेत) त्यांना कौशल्य वाढची संधी देण्यासाठी, त्यांच्या अनोख्या निर्मिर्ण कलेला सर्वांसमोर घेऊन येत त्यांना जगाशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याचे कार्य क्राफ्टरूट्सने १९९५ पासून हाती घेतले आहे, क्राफ्टरूट्स ने भारतीय हस्तकला पुनरुज्जीवित आणि मजबूत करण्यासाठी एक इको-सिस्टम तयार केली आहे.२१ राज्यांमधील २५००० हून अधिक कारागीरांसोबत, १४ एनजीओ आणि ७० हून अधिक क्राफ्टरूट्स नेटवर्कद्वारे कार्य करणारे क्राफ्टरूट्स व्होकल फॉर लोकल दृष्टिकोनासह राष्ट्र उभारणीत योगदान देत आहे.देशभरातील कारागिरांना जगभरातील लोकांशी जोडण्यासाठी क्राफ्टरूटस महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पुणे येथे हस्तकला प्रदर्शनाचे आयोजत केले आहे. हे प्रदर्शन डच पॅलेस, बंड गार्डन रोड, रेसिडेन्सी क्लब समोर, आयनॉक्स थिएटर जवळ, पुणे, महाराष्ट्र ४११००१ येथे २ ते ६ फेब्रुवारी पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत होत आहे. या प्रदर्शनात भारतातील २१ राज्यांतील ७० हुन अधिक हस्तकलांच्या अनोख्या कलाप्रकांसह, १०० हून अधिक आर्टिस्टने सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आनंदीबेन पटेल(उत्तर प्रदेश राज्यपाल). दीपक वसंतराव केसरकर ( शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र ),   अनारबेन पटेल ( संस्थापक ग्रामश्री आणि क्राफ्टरूट्स ) यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *