पुण्यात आसियान ट्रेड (ASEAN Trade ) ची सुरूवात
१८ ऑगस्ट २०२३ रोजी पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रॅंड येथे इंडियन आसियान ट्रेड मीट्स या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद म्यानमारचे राजदूत एच.ई. मोए क्याव आंग आणि लाओसचे राजदूत एच.ई बाउंमी वॅनमनी यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यातुन संपन्न झाली. यावेळी भारत आणि आसियान देशांमधील व्यापार संबंधांना गती देण्यासाठी म्यानमारचे काउंसिल डॉ. रंगनाथन, पुष्कराज एंटरप्रायझेसचे अध्यक्ष शैलेंद्र गोस्वामी हे प्रमुखरित्या उपस्थित होते. या परिषदेला इंडियन इकॉनॉमिक ट्रेड ऑर्गनायजेशनचे जागतिक अध्यक्ष डॉ. आसिफ इक्बाल आणि अन्य विविध प्रतिनिधींचीही उपस्थिती होती. यावेळी भारत आणि आसियान यांच्यातील आपसी संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. सचिन मधुकर काटे यांना या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ट्रेड कमिशनर पदी नियुक्त करण्यात आले.
भारत आणि असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्स (ASEAN) यांनी आपल्या दृढ, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधातुन तसेच पारस्पारिक करारातुन आपली बहुआयामी भागीदारी मजबूत करण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. आसियान- इंडिया फ्री ट्रेड एग्रीमेन्ट (एआयएफटीए) सारख्या करारांमुळे त्यांच्या दोन्ही बाजू बळकट झाल्या असुन व्यापार आणि गुंतवणूकीद्वारे परस्पर संबंध वाढवण्यासाठी ते दृढ आणि वचनबद्ध आहेत. हे करार व्यापारातील अडथळे आणि शुल्क प्रभावीपणे कमी करतात, तसेच वाणिज्य क्षेत्रातील आणि गुंतवणूकीत वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. सीमापार व्यापारासाठी आणि कनेक्टिव्हिटी अधिक गतिमान करण्यासाठी, भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग आणि कलादान मल्टीमॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट यासारखे दूरदर्शी उपक्रम प्रत्यक्षात येत आहेत. एकात्रितरित्या होणार्या आर्थिक सबलीकरणाच्या हेतूवर याद्वारे भर दिला जात आहे.