पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना मिळणार प्रिंटर ची सुविधा
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना मिळणार प्रिंटर ची सुविधा नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणारा स्मशान परवाना मृतांच्या नातेवाईकांना घ्यावा लागतो. मात्र काही वेळेस नातेवाईकांकडे कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने परवाना मिळत नाही. त्यामुळे प्रिंट काढणे किंवा झेरॉक्स काढणे त्याठिकाणी शक्य नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
तसेच स्मशान परवाना मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाहीत.या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विलंब तर होतोच पण अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतांच्या नातेवाईकांना, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना तिष्ठत राहावे लागत होते. प्रिंटर व झेरॉक्स ची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून स्मशान परवाना मिळण्यात नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या.
नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर व श्री. गिरीश जैन यांच्या पुढाकाराने या वैकुंठ स्मशानभूमीत आरोग्य निरीक्षकांकडे प्रिंटर सुपूर्त करण्यात आला. यावेळी माझ्या समवेत श्री. गिरीश जैन, आरोग्य निरीक्षक तमन्नार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सरचिटणीस श्री. राम पालखे आणि पास केंद्र निरीक्षक संजय सोनवणे आदी उपस्थित होते.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना मिळणार प्रिंटर ची सुविधा