पुण्यातील नव्या स्टोअरसह ‘सुता’चा २०२४ मध्ये प्रवेश
‘सुता’ या ब्रँड ने भारतातील सर्वोत्कृष्ट अस्सल स्वदेशी कारागिरीसाठी प्रसिद्ध साडी ब्रॅण्डमध्ये विकसित केला आहे. अग्रगामी विचारांच्या डिझाइन, निर्दोष कारागिरी आणि समावेशकतेप्रति समर्पण यासाठी सुता ब्रँड सर्वत्र ओळखला जातो. आपल्या दूरदृष्टीने, कलेक्शन आणि परिणामकारक कॅम्पेनच्या माध्यमातून अधिक समावेशक आणि स्वीकारार्ह जगाला चालना देऊन, व्यक्तींना प्रेरणा देणे व त्यांची उन्नती करणे हे ‘सुता’चे लक्ष्य आहे. भारताची अनेक शतके जुनी असलेली विणकामाची परंपरा आणि सध्याची स्टाईल यांचा परिपूर्ण संगम म्हणजे ‘सुता’. सुजाता बिश्वास आणि तानिया बिश्वास या दोन बहिणींनी २०१६ मध्ये ‘सुता’ या ब्रँडची स्थापना केली
पुण्यात सुता ने युनिट बी, लोअर ग्राउंड फ्लोअर, शंकर भवन, प्लॉट नंबर १, एस नंबर-१२८/१, बर्गर किंग आउटलेटच्या खाली, पौड रोड, कोथरूड, पुणे– ४११०३८ येथे नवीन स्टोअर सुरु केले आहे. ‘सुता’ चे मुंबई, ठाणे, बंगलोर, कोलकता, हैदराबाद, चेन्नई, भुवनेश्वर येथे स्टोअर्स असून २०२३ च्या अखेरीस दिल्लीमध्ये पॉप-अप स्टोअर सुरू करण्यात आले आहे
या ब्रँडच्या वैशिष्ट्यांनुसार कोथरूडमधील या स्टोअरमध्येही स्थानिक संस्कृतीचा प्रभाव आणि ‘सुता’च्या अनन्य अशा स्वदेशी सौंदर्यदृष्टीचा संगम यांचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल.
“आम्ही स्टोअरच्या अंतर्भागात सुंदर इंटेरियर, उबदार अशा दगडी फरशा, पारंपारिक दिवे आणि लाकडी अॅक्सेंट यांचा अतिशय सुरेख वापर केला आहे ज्यामुळे येथे आमंत्रित वातावरण आपसूकच तयार होते. तसेच या सुंदर शहराला एक मानवंदना म्हणून आम्ही स्टोअरच्या दर्शनी भागात मराठी संस्कृतीतील वाड्यांच्या प्रेरणेने काही कमानींची भर घातली आहे. तपशिलांवर काटेकोर लक्ष देऊन शक्य होईल तेवढ्या स्थानिक घटकांची भर घालणे, हे आमचे नेहमीच लक्ष्य राहिले आहे. शेवटी हे स्टोअर म्हणजे आमच्या सर्व ‘सुता’ क्वीन्ससाठी एक हक्काची जागा असेल – जिथे त्या आनंदाने येऊ शकतील, तासनतास खरेदी करू शकतील आणि घरच्यासारखं वातावरण अनुभवू शकतील” असे ‘सुता’च्या सह संस्थापिका तानिया बिश्वास म्हणाल्या.
सुता’च्या सह संस्थापिका सुजाता बिश्वास म्हणाल्या की “मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून अगदी वेळेवर पुण्यासाठी आमचे द्वार उघडताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पुण्यातील सुंदरशा ‘सुता’ समुदायाला केंद्रस्थानी ठेवून त्यांना उत्तेजनार्थ अनेक स्टोअरकेंद्रीत कार्यक्रमांचे आम्ही नियोजन करीत आहोत. यात कार्यशाळा, भेटीगाठी, पार्टी, उत्सव आणि अन्य बरेच काही असेल. अर्थात, नियमित ग्राहकही येथे विशेष सूट, विशेष उत्पादने आणि इतर विशेष विस्मयकारक अनुभवांची अपेक्षा करू शकतात!”
