NEWS

पुण्याची शान- सारा शुक्ला आता वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनमध्ये

Share Post

सारा शुक्ला हिने वयाच्या १३ व्या वर्षी लामा फेरा हीलिंग (पर्यायी औषध थेरपी) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले ज्याला आता वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांनी “भारतातील सर्वात तरुण लामा फेरा मास्टर हीलर” म्हणून मान्यता देऊन प्रमाणित केले आहे. त्या संदर्भातील सर्व माहिती ईमेल द्वारे 10 एप्रिल 2023 रोजी प्राप्त झाली. ती आता युरो स्कूल, उंड्री येथे इयत्ता दहावीत शिकत आहे.लामा फेरा हीलिंग हे 2500 वर्ष जुने बौद्ध उपचार तंत्र आहे ज्याचा उपयोग शरीरातील 5 घटकांना संतुलित करण्यासाठी केला जातो ज्यामुळे तणाव, नैराश्य, चिंता, व्यसन, आत्महत्येचे विचार आणि नकारात्मक विचारसरणीपासून मुक्तता मिळते. सारा ही प्रसिद्ध लेखक, लामा गुरु डॉ. सत्येंद्र शुक्ला यांची कन्या आहे. डॉ. सत्येंद्र शुक्ला हे भारतातील सर्वात मोठे आणि पहिले ISO प्रमाणित – लामा फेरा आंतरराष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तसेच लामा फेरा मठ, पुणेचे संस्थापक आहेत. सारा शुक्ला लामा फेरा हीलिंग थेरपी वापरून “तणावमुक्त भारत” या संकल्पनेसह काम करत आहे.या उपलब्धी बद्दल बोलताना सारा म्हणाली, “माझा हा पुरस्कार मी माझ्या राष्ट्र भारताला समर्पित करते आणि माझ्या लहानपणापासून सतत प्रेरणा देणारे माझे पालक यांची ही पुण्याई मानते” माझ्या समवयीन मित्रांना संदेश म्हणून भावना व्यक्त करतांना ती म्हणाली; “तुम्ही फक्त शाळेत जाणारी मुले नाही आहात, तुम्ही आपल्या राष्ट्राचे भविष्य आहात त्यामुळे स्वतःबरोबर राष्ट्रासाठीही काम करा. चला सर्वजण एकत्र येऊ या..आपल्या दैनंदिन जीवनात योग-ध्यान रुजवून आपला देश “तणावमुक्त भारत” बनवण्यासाठी हातभार लावूया. जय हिंद !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *