पुणे शहराचे पहिले महापौर श्री. बाबुराव सणस यांच्या स्मरणार्थ सणस ग्रुपकडून घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन
सणस ग्रुपचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र सणस व त्यांच्या परिवाराच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून दर वर्षीपुणे डर्बी या घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जाते.
भारतातील एक महत्वाचे महानगर म्हणून आज पुण्याची मोठी ओळख आहे. पुणे महानगराच्या विकासाचा ध्यास आणि व दूरदृष्टी असलेली व्यक्ती म्हणुन बाबुराव सणस यांची मोठी ओखळ होती. बांधकाम व्यवसाय चालवणारे श्री. सुरेंद्र सणस देखील आज आपल्या आजोबांचे संस्कार व विचारसरणीस अनुसरून आपला व्यवसाय चालवत आहेत. त्यांना घोड्यांची प्रचंड आवड असून ते गेल्या ४० वर्षांपासून घोड्यांच्या शर्यतीत भाग घेत आहेत.
सध्या सुरेंद्र सणस हे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब चे सलग दुसऱ्या वेळेस अध्यक्ष बनले असुन घोड्यांच्या शर्यती व टर्फ क्लब च्या सुधारणेत आणि यशामध्ये त्यांचा व त्यांच्या कमेटीतील अन्य सहकाऱ्यांचा महत्वाचा वाटा आहे.
या वर्षीची द मेयर बाबुराव सणस मेमोरियल पुणे डर्बी अतिशय उत्साहात पार पडली. या वेळी पुणे व पुण्याबाहेरील अनेक नामांकित व्यक्तींनी येथे हजेरी लावली होती. लाईव्ह बॅड व खाद्यपदार्थांची रेलचेल असलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.