पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉनचे, १२ मार्चला आयोजन
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्यावर, फ्रीरनर्स चॅरिटेबल ट्रस्ट १२ मार्च २०२३ रोजी, पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉनच्या ५ व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. फ्रीरनर्स चॅरिटेबल ट्रस्ट (एफसीटी) ची स्थापना कमांडर जितेंद्रन नायर आयएन (निवृत्त) यांनी २०१५ मध्ये केली. लोकांना आरोग्याचे महत्व पटवुन देत फिटनेससाठी प्रोत्साहन देणे हे त्यांचे स्वप्न होते. समाजातील विविध स्तरांतील लोकांसाठी एफसीटी दररोज एरोबिक रनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योग यासारखे मोफत फिटनेस प्रोग्राम आयोजित करते. याशिवाय, एफसीटी वंचितांसाठी अन्न, कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स वाटप, स्टेशनरी वाटप, संबंधित विषयांवर शैक्षणिक चर्चा, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी निधी उभारणे, ई-कचरा संकलन इ. यासारखे नियमित सामाजिक आणि धर्मादाय उपक्रम राबवते. आज पत्रकार संघात आयोजीत एका पत्रकार परिषदेमध्ये मीडियाशी संवाद साधताना पीडब्लूएचएमच्या रेस डायरेक्टर मनीषा साहू म्हणाल्या, “या वर्षी, ५ व्या एडीशनमध्ये, आम्ही सुमारे ५००० महिलांच्या सहभागाची अपेक्षा करत आहोत, आजच्या काळात अधिकाधिक लोक त्यांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. स्त्री प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळी व महत्त्वाची भूमिका बजावते जसे की आई, पत्नी, मुलगी , बहीण इत्यादी आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी त्यांचे योगदान नेहमीच महत्त्वाचे असते. आजच्या युगात, बहुतेक स्त्रिया दुहेरी भूमिका बजावतात, कॉर्पोरेट जगाचे नेतृत्व देखील करतात आणि घर देखील अतीशय चांगल्या पद्धत्तीने संभाळतात म्हणुनच त्यांनी स्वताच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे संपूर्ण लक्ष दिली पाहिजे.” त्या पुढे म्हणतात की, महिलांचे आरोग्य हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्येष्य आहे आणि तो नेहमीच राहील, कारण त्या आपल्याला राष्ट्र विकासाकडे नेतात आहे. स्त्रिया शरीराने, आत्म्याने आणि मनाने निरोगी असल्या तर संपुर्ण वातावरणात याचा सकारात्मक प्रभाव जाणवतो. पीडब्लूएचएम केवळ महिलांसाठी आयोजित केले जाते कारण त्यांच्या मते प्रत्येक स्त्री ही स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासोबतच संपूर्ण परिवर्तन घडवण्याची क्षमता ठेवते. विविध क्षेत्रातील महिलांनी निरोगी जीवनशैलीच्या फायद्यांचा अनुभव घ्यावा यासाठीचे व्यासपीठ असलेल्या मॅरेथॉनची सुरुवात पुणे रूलर पोलीस ग्राऊंड, डॉक्टर होमी भाभारोड, चव्हाण नगर, पुणे येथून १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ५.३० वाजता होणार आहे. २१ किलोमिटर रेससाठी सकाळी ५.३० वाजता, १० किलोमिटर रेससाठी सकाळी ६ आणि फन रन ५ किलोमिटर साठी सकाळी ७ वाजताची वेळ निश्चीत करण्यात आली आहे ही मॅरेथॉन सर्व वयोगटातील महिला आणि मुलींसाठी खुली आहे. एआयएमएस सर्टिफाईड मार्गावर आयोजीत या मॅरेथॉनमध्ये ५ किमी , टाइम्ड रन १० किमी आणि २१ किमीचा समावेश असेल. प्रत्येक सहभागीला टी-शर्ट आणि फिनिशर मेडल दिले जाईल. याव्यतिरिक्त, १० किमी आणि २१ किमीच्या सहभागींना ई-सर्टिफिकीट्स मिळतील. याचबरोबर एक मजेदार झुंबा सेशन होईल आणि गरमागरम नाश्ता देखील दिला जाईल. तसेच, कार्यक्रमासाठी नोंदणी करणाऱ्या सहभागींसाठी वानवडी, उंड्री, बाणेर, बालेवाडी, पुणे युनिवर्सीटी, कर्वेनगर आणि सहकार नगर येथे मोफत प्रशिक्षण सत्र आयोजित केले जातात. या इव्हेंटसाठी आसोसिएट पार्टनर -बजाज फिनसर्व्ह, एनर्जी पार्टनर- फास्ट एन अप, ट्रेनिंग पार्टनर- जयनगर जग्वार्स, न्यूट्रिशन, एज्युकेशन पार्टनर -जुविनेट वेलबीइंग आणि मार्केटिंग पार्टनर ब्लुटेक मीडिया आहे. सर्व वयोगटातील महिला आणि मुलींना या मेगा कार्निव्हलमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. नोंदणीसाठी कृपया – https://www.townscript.com/e/pune-womens-half-marathon-041400 ला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी ९७६४७६५२५२ वर संपर्क साधा.

