20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पुणे फेस्टिव्हल कार फिएस्टामधील जुन्यास मोटारी बघण्यास पुणेकरांची गर्दी

Share Post

यंदा ‘पुणे फेस्टिव्हल कार फिएस्टा’ ही जुन्या मोटरींची विंटेज कार रैली विशेष आकर्षण ठरली. रविवार दि. ४ सप्टे. रोजी सकाळी ९.३० वाजता रेसिडेन्सी क्लब येथून ही रैली सुरु करण्यात आली. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी व सौ. मीरा कलमाडी यांनी  रैलीला प्रथम हिरवा झेंडा दाखवून रैलीची सुरुवात केली. या प्रसंगी सौ. पूनम व विशाल गोखले, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्रऑटोमोटिव स्पोर्ट्सअसोसिएशनचे अध्यक्ष व संयोजक श्रीकांत आपटे आदींनी देखील हिरवा झेंडा दाखवला.  

ही विंटेज कार रैली रेसिडेन्सी क्लब येथून निघाली पुणे कॅम्प, सदर्न कमांड, बंडगार्डन असा १० की. मी.चा प्रवास पूर्ण करून सकाळी ११.३० वाजता रेसिडेन्सी क्लब येथे परतली. यामध्ये योहान पूनावाला, जहीर वकील, अमूल्य व पंकज डहाणूकर, धनंजय बदामीकर, शंतनू देशपांडे,  मुंबईचे पराग राजदा,  फलटणचे रघुनाथ नाईक निंबाळकर, जयसिंह मारवाह,  जोनस पवार, शिरोळे कुटुंबीय आदींच्या विंटेज कार यामध्ये होत्या.

बेटली (१९६६), मर्सिडीज (१९७४) मर्सिडीज (१९८३), फियाट (१९३९), फियाट (१९५७), फियाट (१९६२), वोक्सवैगन (१९६७), जीप, फोर्ड जीप (१९४२), प्लायमाउथ (१९५४), प्लायमाउथ (१९५५), प्लायमाउथ (१९४७), बेंटली, ऑस्टिन मार्टिन, ट्रीयंप सुपर सेव्हन (१९३०), मौरीस (१९४६), फरारी, पोर्श,  शेवरलेट, बी.एम.डब्लू., हिल मिन्कस (१९५५), रोल्स रॉयस असे एकूण ५५ विंटेज कार्स यामध्ये होत्या. याचे संयोजन  महाराष्ट्र ऑटोमोटिव स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत आपटे यांनी केले. पुणे फेस्टिव्हलच्या  क्रीडा स्पर्धा समन्वयक प्रसन्न गोखले हे आहे. हॉटेल रेसिडेन्सी क्लब येथे बक्षीस वितरण संपन्न झाले.  संपूर्ण मार्गावर विंटेज कार रैली बघण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.