पुणे पुस्तक महोत्सव पुण्यात नव्हे, तर राज्यातही प्रसिद्ध झाला
पुणे पुस्तक महोत्सव पुण्यात नव्हे, तर राज्यातही प्रसिद्ध झाला आहे. मी माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावरील पुस्तक प्रदर्शन पाहिले नाही. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत सामान्य नागरिकांची पुस्तक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता, हे पुस्तक महोत्सवाचे यश आहे. या पुस्तक महोत्सवातून मी सुद्धा तीन पुस्तके खरेदी केली आहेत. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून, तर, अमितभाई शहा यांनी पक्ष कार्यालयात ग्रंथालय असण्याबाबत भूमिका मांडली होती. त्या अनुषंगाने हा पुस्तक महोत्सव महत्त्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे अमृत काळातील भारत सुवर्ण काळाकडे जात आहे. अमृत काळाचा संकल्प आणि सुवर्ण काळाचे स्वप्न पूर्ण होण्याला पुणे महोत्सवाच्या हातभार लागणार आहे. पुण्यात भव्य स्वरूपाचे पुस्तकांचा महोत्सव भरल्यामुळे नॅशनल बुक ट्रस्ट आणि महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांचे अभिनंदन करायला हवे.
- आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष