पुणे इथे पार पडली, ‘क्वीन ऑफ द वर्ल्ड (QOTW) इंडिया २०२२’ ची पत्रकार परिषद
२०२१ मध्ये एक दिमाखदार आणि यशस्वीरित्या सोहळा सादर केल्यानंतर, नावाजलेली आणि आगळीवेगळी अशी सौंदर्य स्पर्धा ‘क्वीन ऑफ द वर्ल्ड (QOTW) इंडिया २०२२’ ऑक्टोबर २०२२ मध्ये शेड्यूल केलेल्या नवीन आवृत्तीसह परत आली आहे. QOTW हि स्पर्धा सौंदर्य आणि त्या निगडित असणाऱ्या उद्योगाला पुन्हा एका प्रतिष्ठित असे व्यासपीठ उपलब्ध करून देते. या स्पर्धेचा मूळ उद्देश असा आहे कि, आजच्या आधुनिक महिलांसाठी, तिचे वय, वैवाहिक स्थिती आणि पार्श्वभूमी विचारात न घेता सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्णपणे नेतृत्व कार्यक्रम तयार करणे आहे. QOTW इंडिया ग्लॅमर, आत्मविश्वास आणि सौंदर्य या गोष्टीना महत्व देतं, प्रत्येक स्पर्धकाला वैयक्तिक वाढीसाठी उत्कृष्ट अनुभव प्रदान करते.
यावर्षी, QOTW १८ ते ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांना या अद्भुत जगात सामील होण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याची एक सुवर्णसंधी देत आहे. यावर्षी १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण देशभरातील १८ ते ६५ वयोगटातील ६० स्पर्धक सहभागी होणार असून, ज्यांची मुंबई, दिल्ली दक्षिण आणि पूर्व विभागामधून ऑडिशनद्वारे निवड झाली आहे.
याच विषयी क्वीन ऑफ द वर्ल्ड इंडियाच्या सीईओ आणि राष्ट्रीय संचालक उर्मिमाला बोरुआ यांची १५ ऑक्टोबर पुणे इथे पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेच्या दरम्यान उर्मीमाला बोरुआ यांनी क्वीन ऑफ द वर्ल्ड इंडिया मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांची ओळख करून दिली, त्याचसोबत त्यांनी त्यांचं मत सुद्धा मांडलं ज्यामध्ये त्या बोलल्या, आम्हाला सगळ्या महिलांसाठी एक हक्काचं असं व्यासपीठ द्यायचं आहे ज्यामुळे स्वतःची एक वेगळी ओळख जगासमोर बनेल. सोबतच या स्पर्धेमध्ये महिलांच्या व्यक्तिमत्व विकासावरूनच आपल्याला यावर्षीची विजेती सुद्धा मिळेल असं वक्तव्य केले. त्याचबरोबर पुणे इथे सेमी फिनाले तर मुंबई ललित हॉटेल इथे या स्पर्धेची अंतिम फेरी होणार असल्याची सुद्धा माहिती उर्मीमाला बोरुआ यांनी दिली.
यावर्षी QOTW २०२२, २० ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या अंतिम सोहळ्यासाठी करिश्मा कपूरसह इतर काही प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटीं आणि विविध क्षेत्रामधील उदयोजक पाहुणे सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.