NEWS

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन

Share Post

व्यंगचित्र कला ही अत्यंत दुर्मिळ आणि मार्मिक कला आहे.समाजातील अनेक घडामोडींवर आपल्या व्यंगचित्र कलेतून व्यंगात्मक टिपणी करून समाज जागृतीचे काम व्यंगचित्रकार करत असतात. येत्या ५ मे रोजी युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने व कार्टूनिस्ट्स् कंबाईन यांच्या सहकार्याने पुण्यात प्रथमच ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात जगभरातील २५४ तर भारतातील १०० व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला असून,विविध रंग व रेषांचे आविष्कार चोखंदळ पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत.

महोत्सवाचे उदघाटन दि.५ रोजी सकाळी १०.३०वाजता. बालगंधर्व कलादालन पुणे येथे मनसे अध्यक्ष व व्यंगचित्रकार मा.राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. सदरील महोत्सव तीन दिवस चालणार असून तीन दिवस यामध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवा दरम्यान, परिसंवाद, व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके तसेच नवोदित व दिग्गज व्यंगचित्रकारांचा कलाविष्कार अनुभवायता येणार आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महोत्सवास भेट देणार आहेत. परिसंवादामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार व कवी रामदास फुटाणे सहभागी होणार आहेत.तसेच रविवार दिनांक ७ मे रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते व्यंगचित्रकार बांधवांना सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत महोत्सवाचे आयोजक युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड यांनी दिली.यावेळी व्यंगचित्रकार चारुहास पंडित,विश्वास सूर्यवंशी,योगेंद्र भगत,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *