NEWS

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे (पीसीएमसी) “जल्लोष शिक्षणाचा २०२३” ची घोषणा

Share Post

शालेय, आंतरशालेय, शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) “जल्लोष शिक्षणाचा २०२३” हा नाविण्यपुर्ण उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रदर्शित करण्यासाठी तसेच शाळेच्या मानकांचे आणि सर्वोत्तम पद्धतींचे मूल्यमापन करण्याच्या उद्येश्याने आयोजित केला जाणारा हा दोन दिवसीय मेगा बोनान्झा २४ आणि २५ जानेवारी, २०२३ रोजी ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित केला जाईल. याठिकाणी विविध प्रकारचे गेम झोन, स्पर्धा, बुक स्टॉल, शिक्षकांसाठी स्पर्धा, प्रश्नमंजुषा , ट्रेजर हन्टसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील आणि शेवटी बक्षीस वितरण केले जाईल. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने, आयोजकांनी जल्लोष शिक्षणाचा २०२३ ची संकल्पना मांडली आहे. या नेत्रदीपक व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आंतरिक क्षमता दाखवता येतील, आजच्या काळातील आवश्यक कौशल्यांना, कलागुणांना यामुळे वाव मिळेल. कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त म्हणाले, “पिंपरी चिंचवडमधील आमच्या सार्वजनिक शाळांसाठी हा विद्यार्थी-केंद्रित कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्हाला माहित आहे की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये अफाट प्रतिभा आहे आणि त्यांनी केवळ शैक्षणिकच नव्हे तर क्रीडा, कला, नाटक, हस्तकला, तंत्रज्ञान, डिझाइनमध्येही प्रावीण्य मिळवावे ही आमची इच्छा आहे. सहभागी शाळांवर आमचे लक्ष असेल. सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर,एक्सटर्नल कॉलॅबोरेशन, शिक्षक प्रशिक्षण इत्यादीसह विविध पॅरामीटर्सवर सहभागी शाळा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन केले जाईल. आमच्या उपक्रमांद्वारे कल्पनांचे हस्तांतरण आणि मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा हा एक अनोखा प्रयत्न असेल. संदीप खोत, उपायुक्त, पुढे म्हणाले, “पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला अभिमान वाटतो. सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कौशल्ये प्रदर्शित करण्याची, नवविचार करण्याची, तयार करण्याची, डिझाइन बनवण्याची, अपेक्षा साध्य करण्याची, क्षमता विकसित करण्याची सुवर्ण संधी आहे. आम्ही सर्व शाळांना या शैक्षणिक प्रदर्शनाचा भाग होण्यासाठी आणि मोठ्या संख्येने नावनोंदणी करण्यासाठी आवाहन करू इच्छितो जेणेकरुन आम्ही नवीन प्रतिभांना वावा देऊन त्यांना त्यांच्या पात्रतेची नवी ओळख देऊ शकू.” जल्लोष शिक्षणाचा २०२३ मध्ये पीसीएमसी मधील १२९ शाळेंतील विद्यार्थ्यांचा सहभाग दिसेल. एकदा नोंदणी प्राप्त झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील टिम निवडीची सुरुवात झाली जी शालेय स्तरावर आणि शहर पातळीवर पार पडली. प्रत्येक झोनमधील “एक सर्वोत्कृष्ट शाळा” ओळखण्यासाठी शालेय आव्हानांच्या निकषांवर एक सर्वसमावेशक रेटिंग प्रणाली तयार केली गेली आहे. नंतर याला मॉडेल स्कूल ऑफ झोनमध्ये रूपांतरित केले जाईल. ८ मॉडेल स्कूल्स तयार करण्याचे पीसीएमसीचे उद्दिष्ट आहे . जल्लोष शिक्षणाचा २०२३ बद्दल- पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) द्वारे जल्लोष शिक्षणाचा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेरील विचार करावेत, नवकल्पनांसोबत समस्या सोडवण्याची क्षमता निर्माण करावी, टिम तयार करून नलकल्पनांचे सादरीकरण करावे यासाठी हे व्यासपीठ तयार केले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *