20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पहिल्याच दिवशी ‘अथांग’ने जिंकली प्रेक्षकांची मनं

Share Post

Lप्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेली जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ ही वेबसीरिज सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या वेबसीरिजचे पहिले दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या रहस्यमय वाड्याचे दरवाजे आता उघडले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी इतकं रेकॅार्ड ब्रेकिंग यश मिळवणारी ही प्लॅनेट मराठी ओटीटीवरील पहिलीच वेबसीरिज ठरली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी ‘अथांग’ ही वेबसीरिज पाहिली. या वाड्यातील गूढ हळूहळू उडगडत असतानाच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील भागांची.    प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहून खूप समाधान वाटले. ‘अथांग’ला प्रेक्षकांची पसंती मिळणार, हे ठाऊक होते. परंतु पहिल्याच दिवशी असा प्रतिसाद मिळणार हे अपेक्षित नव्हते. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आम्हाला असा कॅान्टेन्ट प्रदर्शित करण्याची प्रेरणा मिळते.’’ निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, ” आज माझ्या मनात काय भावना आहेत, त्या मी शब्दांत व्यक्त करूच शकत नाही. निर्माती म्हणून हा माझा पहिलाच प्रोजेक्ट, त्यामुळे हा माझ्यासाठी सुखावणारा क्षण आहे. मात्र याचे सारे श्रेय ‘अथांग’च्या संपूर्ण टीमला जाते. यामागे सगळ्यांचीच मेहनत आहे. प्रेक्षकांच्या खूप सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आता पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.’’’अथांग’ या वेबसिरीजमध्ये  संदीप खरे, निवेदिता जोशी – सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.