NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणी वरील कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचा तिसरा खंड संपन्न

Share Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचा तिसरा खंड आज भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत सामुदायिकरीत्या विविध मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी जावडेकर बोलत होते. खासदार प्रकाश जावडेकर, रा. स्व. संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, संयोजक योगेश गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.अनुवादक गिरीश परांजपे, मुद्रक शैलेश सावळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन आणि गोगावले यांनी प्रास्ताविक भाषण केले.*भाषणे महत्त्वाचे मुद्दे**डॉ. विनय सहस्रबुद्धे*मन की बात हा रचनात्मक प्रकल्प आहे. या एप्रिलमध्ये १०० कार्यक्रमविनाखंड पूर्ण होतील. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा उद्देशाने हा प्रकल्प स्तुत्य आहे.कुटुंबातील सदस्यांशी हितगुज करणारा, प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. संवाद कौशल्य, अनौपचारिकता हितगुज, खुला उपक्र, जनतांत्रिक, समाजातील सर्व भाषा, प्रांत आणि क्षेत्रातील समावेश अराजकीय कार्यक्रम आणि या माध्यमातून गुण ग्राहक व्यक्ती हुडकून काढून त्यातूनसामान्य व्यक्तींना प्रेरणा ही मन की बातची वैशिष्ट्ये आहेत.*खा. प्रकाश जावडेकर*पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगळ्या पद्धतीने विचार करणारे नेते आहेत. मन की बात, परीक्षा पे चर्चा, स्वयं साक्षाकन, हर घर तिरंगा, तळागाळातील लोकांना पद्म पुरस्कार अशातुन त्यांनी वेगळेपण सिद्ध केले.त्यातून गरिबांवर ही प्रभाव पडतो. कौटुंबिक आणि प्रेरणा देणारे हे कार्यक्रम आहेत. मोदींवर समाजाचा विश्वास निर्माण झाला आहे. राम मंदिर, ३७० कलम, सोमनाथ, केदारनाथ, काशी विश्वेश्वर असे नव्या सांस्कृतिक पुनर्निर्माण केला.डिजिटल इंडिया, नोटबंदी, करदाता संख्या वाढजीएसटी अशा योजना यशस्वी केल्या. जगाची आर्थिक पडझड होत असताना आज जगात ग्रेट ब्रिटन मागे टाकून अर्थ व्यवस्थेत पाचवा क्रमांकावर आहोत हे मोदींचे यश आहे.*डॉ. रवींद्र वंजारवडकर* यांनी संघ विचारातून मन की बात हा विचार मांडला. मन की बातमुळे एक उत्साह ऊर्जा संचारते. जनसामान्यांचा जिव्हाळा, सामान्यांचे हित आणि राष्ट्र निर्मितीचे विषय मन की बात मधून हाताळले. सर्वांना कळेल भावेल असे हलके फुलके कधी धीरगंभीर संवाद कुटुंब प्रमुखा प्रमाणे संवाद साधतात.स्वतः पलीकडे जाऊन कृती करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला भावते. मोदी हे समर्पित आणि कृतज्ञ व्यक्तिमत्त्व.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *