18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचा दुसरा दिवस पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि केरळ ने गाजवला

Share Post

अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (USFI) द्वारे आयोजित दुसऱ्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप पुणे 2022 स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे – बालेवाडी येथे सूरू असून. स्पर्धेत दोन दिवसात पश्चिम बंगालने 19 सुवर्णपदकासह 50 पदके पटकावत आघाडी कायम राखली , तेलंगणाला 13 सुवर्णपदकांसह 23 तर केरळला 8 सुवर्णपदकासह 21 पदके मिळाली.

मागील दोन दिवसांपासून मोठया उत्साहात सुरु असलेल्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप पुणे 2022 स्पर्धेत देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशाचे एकूण 34 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या दोन दिवसांत पश्चिम बंगालला 17 रौप्य आणि 17 कांस्य , केरळला 9 रौप्य आणि 4 कांस्य, तर तेलांगणला 5 रौप्य तर 5 कांस्य पदके मिळाली. याशिवाय तामिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, गुजरात, गोवा, महाराष्ट्र, पाॅंडेचेरी संघाच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली.

दुसऱ्या दिवसाचे महत्वाचे निकाल
400 मीटर- बीआई फिन स्विमिंग- सिनिअर
पुरुष- जनन मोम्ब्रिन, ( पाॅडेचेरी ) सुवर्णपदक, चार्ल्स येन्नुला ( तेलंगणा) रौप्य, प्रतिक पासी ( छत्तीसगड) कांस्य,
महिला- दिपान्विता मंडल ( पश्चिम बंगाल) सुवर्ण, सोहेली मंडल( पश्चिम बंगाल) रौप्य, श्रीनिती एन (तामिळनाडू) कांस्य

200 मीटर बीआई फिनस्विमिंग- सिनिअर
पुरुष- चार्ल्स येन्नुला ( तेलंगणा) सुवर्ण, आयुष रौत( पश्चिम बंगाल) रौप्य, सुबीर मलिक ( पश्चिम बंगाल)
महिला- साची ग्रामोपाध्ये (गोवा) सुवर्ण,

200 मीटर सरफेस ( मोनोफिन) ज्युनिअर डी
मुले- सिद्धार्थ कालिया( तेलंगणा) सुवर्ण, जय जसवंत आर ( तामिलनाडू) रौप्य, आदिदेव प्रदीप( केरळ) कांस्य
मुली- आदिती बिस्वास( पश्चिम बंगाल) सुवर्ण, मेहरीन असीफ (केरळ) रौप्य, देवल प्रशांत पांड्या( गुजरात) कांस्य

200 मीटर सरफेस ( मोनोफिन) ज्युनिअर सी
मुले- पाथुरी भुवास ( तेलंगणा) सुवर्ण, ध्रुव टंक ( गुजरात) रौप्य, अदिदेव प्रदिप (केरळ) कांस्य
मुली- अभिरामी पी.जे (केरळ), पवित्रा श्री एस. डी. ( तामिलनाडू) रौप्य, प्रिशा, टांक (गुजरात) कांस्य,

200 मीटर सरफेस ( मोनोफिन) ज्युनिअर बी
मुले-अर्जून कंदोई ( तेलंगाणा) सुवर्ण, जी. जैसे ( केरळ) रौप्य, संदीप मंडल( पश्चिम बंगाल) कांस्य,
मुली- जिनल पित्रोदा (गुजरात) सुवर्ण, थेरस मारिया( केरळ) रौप्य, बांसुरी मकवाना (गुजरात) कांस्य,