नृत्य क्षेत्रातील व्यक्तींनी फिटनेस साठी आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज -मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस
-नृत्य क्षेत्रातील व्यक्तींनी फिटनेस साठी आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे मत मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस यांनी केले.नृत्यकला मंदिरतर्फे आयोजित नृत्यांजली कार्यक्रमात व्यक्त केले.नृत्यकला मंदिरतर्फे 29 व्या वर्धापन दिनानिमित्त नृत्यांजली हा भरतनाट्यम वर आधारित नृत्याचा कार्य क्रमाचे आयोजन पुण्यातील निगडी प्राधिकरण येथील मनोहर वाधेकर सभागृह येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस, लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष डॉ. अनिकेत काळोखे, 183 वर्ल्ड रेकॉर्ड केलेले डॉ. दीपक हरके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नृत्य कला मंदिराच्या संस्थापिका तेजश्री अडिगे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश गुरु नटराज यांना नमन करणारा श्लोक सादर करून करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये पंचमहाभूतांना सादर करणारी पुष्पांजली, अडव,आलारीपू , सरस्वती कौतुकम, जतीस्वरम, वर्णन पदम ,तिल्लाना या रचना भरतनाट्यमच्या सहा वर्षाचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थिनींनी सादर केल्या.
नुकत्याच झालेल्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठाला अर्पण करण्याकरिता संस्थेतर्फेमंगलम ही रचना खास श्री रामचंद्र कृपाळू भजमन या भजनावर विद्युलता खत्री व संस्कृती मगदूम सोबत संस्थेच्या सर्व सीनियर विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. कार्यक्रमात पढंत तेजश्री आडगे, गायन एन शिवप्रसाद , मृदुंग एच व्यंकटरामन, व्हायोलिन अजय चंद्र माऊली यांनी साथ संगत केली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वार्षिक अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व ओरिसा येथे जाऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये विजयी झालेला महिला पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी नृत्यांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले होते
या कार्यक्रमात वीणा भोसले या विद्यार्थिनीचा दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनातील सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले व आभार अविनाश अडीगे यांनी मानले पिंपरी चिंचवडच्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.