निसर्गाशी एकरूप ‘एमआयटी विश्वज्योती इंटरनॅशनल स्कूल’
संशोधन, क्रीडा, संस्कृती आणि नवनिर्मितीचा मुख्य धागा पकडून विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त अध्ययन देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून निसर्गाशी एकरूप असलेली ‘एमआयटी विश्वज्योती इंटरनॅशनल स्कूल’ सज्ज झाली आहे.
एमआयटीतर्फे मीरा भाईंदर व ठाणे येथील नागरिकांच्या पाल्यांसाठी १४ एकर परिसरात शिक्षणाची नवी परिभाषा घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे.
या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी मीरा भाईंदरच्या महापौर ज्योस्त्ना हसनाळे म्हणाल्या,“परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी शाळा उघडल्यामुळे आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सर्व स्तरावर विकास होईल. अध्यात्म आणि शिक्षणाची सांगड घालून विद्यार्थ्यांचा मानसिक व भौतिक विकास साधला जाणार आहे. त्यांना निसर्गाशी एकरूप होण्याबरोबरच आधुनिक ज्ञान दिले जाणार आहे. हे माझ्या मतदार संघात असल्याचा मला अभिमान आहे.”
युुनेस्को अध्यासन प्रमुख व माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ अशा भागात अत्याधुनिक शाळा सुरू केल्यामुळे येथे सर्व स्तरावर विकास होईल. येथे विद्यार्थ्यांचे संस्कारयुक्त अध्ययनाबरोबरच उत्तम चरित्र निर्मितीवर भर दिला जाणार आहे. शाळेच्या माध्यमातून विवेकवादी विद्यार्थी घडविले जातील. अध्यात्म व विज्ञानाची कास धरून येथील विद्यार्थी विश्वशांतीसाठी कार्य करेल.”
या प्रसंगी मीरा भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले, अॅड. नितिन कारवरकर, सुरेश पाटील उपस्थित होते. तसेच, महाराष्ट्र चित्रपट मंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, माईर्स एमआयटी पुणेचे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे विश्वसत व अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, सुनिता कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका ज्योति कराड ढाकणे, डॉ. अदिती कराड, सुनील कराड, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, अण्णासाहेब टेकाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रध्दा देसाई व ज्यू. कॉलेजचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील उपस्थित होते.