निसर्गसूत्र अभियानाच्या माध्यमातून निसर्गातील रहस्ये उलगडणार
निसर्गसूत्र, बायोस्फीअर्स, शैलेश सराफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे वनविभाग तसेच मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांच्या सहकार्यातून मंगळवार दि. २१ मार्च २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय वनदिन भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे मोठ्या दिमाखात साजरा झाला. सदर उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हाचे मुख्य वनसंरक्षक श्री. एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक (वन्यजीव) श्री. तुषार चव्हाण, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड चे प्राचार्य डॉ. संजय खरात, निसर्गसूत्र आणि बायोस्फीअर्स संस्थेचे डॉ. सचिन अनिल पुणेकर, श्री. शैलेश सराफ, निवेदिता जोशी, श्री. विक्रम बोके, डॉ. संजय लावरे, श्री सुभाष बडवे, डॉ. प्राची क्षीरसागर, श्री. अजित गाळवणकर इ. मान्यवर, निसर्ग उपासक, अभ्यासक, संशोधक, हरित कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन अजानवृक्ष, सुवर्णपिंपळ, औदुंबर आणि तुळशीच्या रोपट्याला जलार्पण करून झाले. सदर उपक्रमात खाली नमूद गोष्टींचा समावेश होता.* निसर्गसूत्र या अभियानाचे – बोधचिन्हाचे आणि संकेतस्थळाचे अनावरण (www.nisargasutra.earth)* ताम्हिणी या संकेतस्थळाचे आणि वेबपोर्टलचे अनावरण (www.tamhini.earth)* डॉ. सचिन अनिल पुणेकर संकल्पित, लिखित Fungi of Western Ghats फंगी ऑफ वेस्टर्न घाटस् या सचित्र माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन (पश्चिम घाटातील बुरश्या) मान्यवरांच्या हस्ते झाले. निवेदिता जोशी यांचे या पुस्तकाच्या निर्मितीला सहाय्य लाभले.* २१ मार्च आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त – २२ मार्च जागतिक जल दिनानिमित्त हरित पत्रकाचे अनावरण झाले.* हरित योद्धांचा यथोचित सन्मान: एकूण सहा हरित योध्यांचा त्यांच्या उत्तम हरित कार्याचा विचार करून सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी ५००० हजार रुपये रोख देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यात प्रा. किशोर सस्ते (वनस्पती संशोधक, लेखक), श्री. सथ्या नटराजन (हरित आंदोलक, पर्यावरण वक्ता – कार्यकर्ता), श्री. संदीप नांगरे (अग्निपंख इको टुरिझम, भिगवण), खराडे कुटुंबीय (अंधारबन होम स्टे, पिंपरी), श्री. रामदास येनपुरे (बर्ड स्टुडिओ, आदरवाडी, ताम्हिणी) आणि श्रीमती वैजयंती गाडगीळ, श्रीमती प्रीती सोनजे, श्रीमती सुजाता जोशी, शेफाली जैन (पुणे लेडीज बर्डर्स) यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांनी त्यांच्या कार्याविषयी उपस्थित नागरिकांशी उत्तम मुक्त-संवाद साधला.* ताम्हिणी आणि परिसरातील वने व जैव-विविधतेवर आधारित राष्ट्रगीताचे आणि लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. सदर लघुपट हे निवेदिता जोशी आणि डॉ. सचिन पुणेकर यांनी तयार केले आहेत.* या कार्यक्रमात उपस्थित पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी उत्तम मार्गदर्शन केले.सदर उपक्रमात पर्यावरण संशोधक, प्रा. डॉ. महेश शिंदिकर यांनी सूत्रसंचालन तर डॉ. सचिन अनिल पुणेकर यांनी प्रस्तावना केली.