29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

स्वामी सेवा संस्थेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनाथ मुलींसोबत रक्षाबंधन हा सण साजरा करण्याचे नियोजन केले होते. ह्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात

निराधारांना राखी बांधून स्वामी सेवा संस्थेने केला अनोखा उपक्रम

Share Post

कात्रज, पुणे – स्वामी सेवा संस्थेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनाथ मुलींसोबत रक्षाबंधन हा सण साजरा करण्याचे नियोजन केले होते. ह्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात निराधारांना राखी बांधून, अनेक भेटवस्तू, शालेय साहित्य, खाऊवाटप,संगीत मैफील, मार्गदर्शनपर व्याख्यान अश्या अनेक माध्यमातून आधार देत नव युवकांना प्रेरणादायी विचार ठेवत हा कार्यक्रम साजरा केला.
याप्रसंगी स्वामी सेवा संस्थेचे अध्यक्ष अक्षय रामभाऊ नेहे यांनी संबोधन करताना सांगितले कि, “आपण आज रक्षाबंधनाच्या माध्यमातून बहिणीचं रक्षण तर करूच परंतु त्यापलीकडे जाऊन त्यांना स्वतःच रक्षण..स्वतः करण्यासाठी प्रवृत्त करु. असे प्रेरणादायी विचार त्यांनी यावेळी मांडले.”


हा कार्यक्रम पार पाडत असताना निस्वार्थ भावनेनी ज्यांनी कार्य केले ते संस्थेचे संपर्कप्रमुख भागवत कदम, तसेच संघटक तेजस गावडे,रविंद्र नेहे, प्रविण सहाणे ,कार्तिक गिऱ्हे व सर्व संस्थेचे सदस्य भागवत गव्हाणे, सम्राट कांबळे,प्रफुल्ल काळे, नागेश जगताप,शुभम गोपाळे, अविनाश एखंडे, भागवत गव्हाणे, वैभव मालुंजकर, अभिजित नाईकवाडी,सूरज सावंत, राम सातपुते,आयुष झेंडे,अंकिता झेंडे,अस्मिता गायकवाड, श्रुती वाल्मिकी,पूजा विश्वकर्मा,मोहिनी जगताप, महावीर गोरे, सौरभ एकाल, गोविंद नेहे, अमोल आंबरे, अमोल नेहे हे सर्व उपस्थित होते.


या प्रसंगी स्वामी सेवा संस्थेकडून रोहन पंढरपुरकर अणि प्रशांत नाईकवाडी यांनी संगीत मैफिल साजरी करून अनाथ मुलांचा आनंद द्विगुणित केला. तसेच भागवत कदम , ज्ञानराज पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केले .संस्थेचे अध्यक्ष अक्षय रामभाऊ नेहे यांनी सर्वांचे आभार मानले.