नायजेरियामध्ये भारतीय कंपन्यांसाठी व्यवसायाच्या संधी
भारताने G-20 चं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या परिषदेसाठी जगभरातील आघाडीच्या देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष भारतात एकत्र येत आहेत. आफ्रिकेचे प्रतिनिधीदेखील या परिषदेस उपस्थित आहेत. आफ्रिकेचे प्रवेशद्वार असलेल्या नायजेरियामध्ये भारतीय कंपन्यांसाठी व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी एनिम्बा इकॉनॉमिक सिटी डेव्हलपमेंट (EECD) चे संस्थापक आणि संचालन प्रमुख सी. डार्ल उझू सध्या जी-२० च्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. भारतीय गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी उझू यांचा पुणे दौरा १० ते १३ सप्टेंबर रोजी असल्याची माहिती क्रेसेंडो वर्ल्डवाईडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल जाधव यांनी दिली आहे.
नायजेरियातील एनिम्बा इकॉनॉमिक सिटी डेव्हलपमेंट (EECD) या परिवर्तनशील उपक्रमाद्वारे दोन्ही देशांचा शाश्वत आर्थिक विकास करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची रचना औद्योगिकीकरण, नवकल्पना आणि आर्थिक वाढीसाठी केली गेली आहे. ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत नायजेरियाचे स्थान उंचावले आहे. नायजेरियाच्या फेडरल गव्हर्नमेंट ऑफ एक्सपोर्ट (MINE) कार्यक्रमांतर्गत EECD ला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) मुक्त व्यापार क्षेत्राचा दर्जा आहे. भारत आणि नायजेरियाच्या व्यापार सुलभतेसाठी EECD मध्ये व्यवसाय करणार्या भारतीय कंपन्यांना स्थानिक, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून विशेष प्रोत्साहन देण्यासाठी तरतूद केली आहे.
विशाल जाधव म्हणाले की, भारतातील आघाडीची आंतरराष्ट्रीय व्यापार आणि थेट विदेशी गुंतवणूक सहाय्यक संस्था क्रेसेंडो वर्ल्डवाईडने EECD मध्ये विस्तार करण्यास इच्छुक असलेल्या अनेक क्षेत्रांतून येणाऱ्या 46 हून अधिक कंपन्यांची यशस्वी ओळख करून दिली आहे. नायजेरियाला महत्वाचे स्थान मानून इतर आफ्रिकन देशांत पुन्हा निर्यात सुरु करण्याचेही या कंपन्यांचे उद्दिष्ट आहे. शहरी पायाभूत सुविधांच्या विकासात स्वारस्य असलेल्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांना EEDC मध्ये भाग घेण्यासाठी क्रेसेंडो गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देते.
क्रेसेन्डो वर्ल्डवाइडचे सहयोगी उपाध्यक्ष कौशल शाह म्हणाले, भारतीय गुंतवणूकदारांनी विशेषत: ऑटोमोटिव्ह, हेल्थकेअर, पॅकेजिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स या क्षेत्रांमध्ये उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना आखत या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. भारतीय कंपन्यांना नायजेरियातील कार्याचा विस्तार करण्यासाठी मदत करण्याबरोबरच गेल्या काही वर्षांमध्ये भारत-नायजेरिया व्यापार संबंधांच्या उत्कर्षामध्ये क्रेसेन्डो संस्था हि EECD ची एक विशेष सहयोगी व्यवसाय भागीदार झालेली आहे. त्यामुळे क्रेसेन्डो वर्ल्डवाइडच्या मदतीने लवकरच १३ कंपन्यांचे शिष्टमंडळ नायजेरियाला भेट देणार आहे.
2022 च्या आर्थिक वर्षात, भारताचा नायजेरियाच्या व्यापारी भागीदारांमध्ये 5 वा क्रमांक लागतो. या आर्थिक वर्षामध्ये या दोन राष्ट्रांमधील द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण US$ 11.8 बिलियन पर्यंत पोहोचले आहे. विशेषतः, नायजेरियाला भारताची निर्यात US$ 5,159.44 दशलक्ष इतकी होती, तर याच कालावधीत नायजेरियातून आयात US$ 6,692.65 दशलक्षवर पोहोचली. शिवाय, नायजेरियात भारतीय मालकी आणि ऑपरेशन असलेल्या 135 पेक्षा जास्त कंपन्या आहेत, अंदाजे US$ 19.3 अब्ज गुंतवणुकीचा अभिमान आहे. हे भारतीय उद्योग फार्मास्युटिकल्स, पॉवर आणि ट्रान्समिशन, मॅन्युफॅक्चरिंग, ग्राहकोपयोगी वस्तू रिटेल, बांधकाम आणि हवाई सेवा यासह विविध क्षेत्रांमध्ये सक्रियपणे गुंतलेले आहेत.