नागरिकांच्या पैशाची होतीय लूट
पालिका प्रशासनाने पथदिव्यांच्या कामातील ढिसाळपणा समोर आला पालिका प्रशासनाने कुठलीही पथदिव्यांची शहानिशा न करता टेंडर काढण्यात आले आहे. हे टेंडर ठेकेदारांच्या मलई साठी काढण्यात आले आहे. असा आरोप आप चे कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केला, संपूर्ण माहिती अशी त्रिमूर्ती चौक ते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन या दरम्यान अनेक पददिवे चांगले, दिमागदार उभे असून देखील का बदलण्यात येत आहेत, हा एक पथदिव्याचा विषय नसून ह्याच लाईनीत 15 ते 20 पथदिवे चांगले आहेत, हा खरा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी पथदिवे नाहीत, तिथे मात्र पालिकेचे अजिबात लक्ष नाही. जिथे चांगले दिवे आहेत, तिथे मात्र बदलण्यात येतात,विशेष म्हणजे यासंदर्भात कोणीच बोललातयार नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. पथदिव्यांच्या कामातील कोट्यावधीचा गैरव्यवहार शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेने नागरिकांच्या पैशाची चाललेली लूट लक्ष देण्यास कोणीच नाही. लवकरात लवकर निवडणुका या जाहीर झाल्या पाहिजे नाहीतर पालिकेचा भोंगळ कारभार असा सुरू राहील असे प्रशांत कांबळे यांनी सांगितले.