‘नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार’
असामान्य नाट्यकर्तृत्वासाठी बहाल केला जाणारा महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार’ आणि अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती, सांगली यांचे मानाचे ‘आद्य नाटककार विष्णूदास भावे गौरव पदक’ मिळाल्या प्रित्यर्थ ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते सतीश आळेकर यांचा सत्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र येथे बुधवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सांयकाळी सहा वाजता संपन्न होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे हे असतील. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललितकला केंद्र गुरुकुलाचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे व लेखक, समीक्षक राज काझी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
पुण्याच्या रंगकर्मीयांच्या वतीने होणाऱ्या या सत्कार सोहळ्यास सर्व रंगकर्मी व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे विनंती पुणे नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली आहे.