धंगेकर यांच्या प्रचारार्थकोपरा सभांना मोठा प्रतिसाद
कसबा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी प्रभागाप्रमाणे कोपरा सभा घेण्यात आल्या त्या कोपरा सभांना महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ठीक ६.००० वाजता पहिली सभा प्रभाग १५ माती गणपती चौक येथे झली, प्रभाग क्रमांक १६ फडके हौद चौक येथे दुसरी आणि प्रभाग क्रमांक १८ खडकमाळ आळी चौक येथे तिसरी कोपरा सभा झाली. गुरुवार पेठ पान घंटी चौक यथे झालेल्या कोपरा सभेत आमदार संग्राम थोपटे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, सप्रभारी हाजी दादु सेठ खान, महाराष्ट्र प्रदेश सचिव समनव्यक डॉक्टर नदीम भाई यांचासह महाविकास आघडीचे व मित्र पक्ष्याचे पदाधिकारी उपस्थित होते.या कोपरा सभेत माजी राज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले कि खा.गिरीश बापट खूप आजारी असताना हि त्यांना मतांच्या राजकारणासाठी भाजपने प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला हि संतापजनक बाब असून त्याचा मी निषेध करतो. फडके हौद यथे झालेल्या कोपरा सभेत प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी नदीम खान शिवसेनेचे संदीप गायकवाड व सुरेश लोखंडे आदीची भाषणे झाली. कॉंग्रेस पक्षाने जनतेच्या हितासाठी ज्या योजना आणल्या त्याच योजनाची नावे बदलून हे सरकार काम करित आहे असे नदीम खान म्हंटले निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असून कट्टर शिवसैनिक आता पेटून उठला आहे. त्यामुळे अधिका अधिक मतदान करून धंगेकरना निश्चित विजयी करणार असे शिवसेनेचे संदीप गायकवाड म्हणाले. माती गणपती येथे झालेल्या कोपरा सभेत कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की पुणे महानगरपालिकेची अनेक कामे झाली नाहीत तरी खोटी बिले तयार करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या संदर्भात भिडे पुला येथील महिला स्वच्तागृहाचे उदहरण त्यांनी दिले. मनीषा पाटील यांनी जुन्या वाड्यांचे प्रश्न भाजपने सोडवले नाहीत यावर टीका केली. या कोपरा सभांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्याचे आयोजान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राजेंद्र आलमखाने, कॉंग्रेसचे राजू शेख आणि राष्ट्रवादीचे विभाग उपअध्यक्ष संतोष जोशी यांनी केले. या सर्व कोपरा सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत असून कसब्यात परिवर्तनाची लाट दिसून येत आहे असे राजेंद्र आलमखाने म्हणाले.