धंगेकर यांचे काम आणि महाविकास आघाडीची एकत्रित ताकद यामुळे विजय निश्चित-जयंत पाटील
मोहन जोशी म्हणाले, महाविकास आघाडी पहिल्या दिवशीपासून रविंद्र धंगेकर यांचे काम जोमाने करीत आहे. मतदारसंघातील बैठका, सभा, कोपरा सभा, रॅलीला उर्त्स्फूत सहभाग आहे. महाविकास आघाडीचे नियोजन, समन्वय चांगले असल्याने विजय निश्चित होणार आहे. तिन्ही पक्षांचा कार्यकर्ते, पदाधिकार्याचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंदना चव्हाण म्हणाल्या, महाविकास आघाडीचा प्रचार यंत्रणेत सहभाग आहे. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता जोमाने काम करीत आहे. शेवटच्या घटकांपर्यंत काम सुरु असल्याने महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. प्रशांत जगताप म्हणाले, कसबा मतदार संघात बदल होणार आहे. रविंद्र धंगेकर हे आपल्या कामातून लोकप्रिय आहेत. बहुजन समाजापासून व्यापारीवर्ग, ब्राम्हण समाजदेखील त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे यश दूर नाही. रविंद्र माळवदकर, कमलताई ढोले पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. गणेश नलावडे यांनी प्रस्ताविक व सुत्रसंचालन केले. अजिंक्य पालकर यांनी आभार मानले.