26/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

द जंपिंग गोरिलाने जाहीर केला ‘एलिट ऍथलिट स्पॉन्सरशीप प्रोग्राम’

Share Post

द जंपिंग गोरिल्ला संस्थेच्या वतीने 2023 या वर्षा करीता ज्यांना ट्रेल रनिंगची आवड आहे आशा उत्साही व होतकरू खेळाडू व धावापटूंसाठी ‘एलिट ऍथलिट स्पॉन्सरशीप प्रोग्राम’ जाहीर केला आहे. आज (22 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. द जंपिंग गोरिल्ला एलिट ऍथलिट हाय-परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटरच्या वतीने ‘टाईम ट्रेल’ चाचणी घेतल्यानंतरच या स्पॉन्सरशीप प्रोग्रामसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. स्पॉन्सरशीपचा कालावधी दोन वर्षांचा असणार आहे. याप्रसंगी इन्फ्राबीट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रवींद्र सराफ, ‘द जंपिंग गोरिल्ला’ संस्थेचे संस्थापक आदिनाथ नाईक, सहसंस्थापक जयगोविंद यादव, आदी उपस्थित होते. ‘एलिट ऍथलिट स्पॉन्सरशीप प्रोग्राम’ हा क्रीडा विश्वातील एक महत्वाचा कार्यक्रम ठरेल, असा विश्वास व्यक्त करून ‘द जंपिंग गोरिल्ला’ संस्थेचे संस्थापक आदिनाथ नाईक म्हणाले की, यामध्ये पुरुष निवासी कार्यक्रम, फक्त  महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि कार्यक्रमात सहभागी होऊ न शकणार्‍या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर यांसह तीन श्रेणी असतील. निवडलेल्या खेळाडूंना अनुभवी प्रशिक्षक, डॉक्टर आणि क्रीडा संशोधकांच्या अंतर्गत निवासी प्रशिक्षणासह केंद्राच्या सर्व संसाधनांमध्ये प्रवेश असेल.या कार्यक्रमाला इन्फ्राबीट टेक्नॉलॉजीज आणि लॉफ्टी ड्रीम्स स्पोर्ट्स डेव्हलपमेंट ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे.इन्फ्राबीट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रवींद्र सराफ म्हणाले, 50 किमी आणि 100 किमी माउंटन ट्रेल रन  विभागातील प्रतिभासंपन्न महिला व पुरूष खेळाडूंचा शोध घेणे हा या स्पॉन्सरशीप प्रोग्रामचा खरा उद्देश आहे. प्रामुख्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना घडविणे व त्यांच्या करिअरला दिशा देण्याचे काम यामाध्यमातून केले जाईल. या स्पॉन्सरशीप प्रोग्राम अंतर्गत खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण देणे, त्यांना मार्गदर्शन करणे व सर्वप्रकारचे पाठबळ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे.    टाइम ट्रायल शर्यतीचा  भाग म्हणून 25 आणि 26 फेब्रुवारी 2023 रोजी भारतभरातील ऍलीट खेळाडू ‘टाईम ट्रेल’ चाचणी शर्यतींसाठी  सहभागी  होत आहेत. निवडलेले खेळाडू ; आशिया आणि युरोपमधील आंतरराष्ट्रीय  ट्रेल रेस आणि मॅरेथॉनमध्ये  सहभागी  होतील.’एलिट ऍथलिट स्पॉन्सरशीप प्रोग्राम’साठी खालील दोन विभागात निवड चाचणी घेतली जाईल. *विभाग 1 – रोड रेस टाइम ट्रेल रन*तारीख – 25 फेब्रुवारी 2023वेळ – कीर्ती गार्डन इंडियन स्पोर्ट्स रिव्होल्यूशन कॅम्पस, पाषाण सुस रोड, ऑडी शोरूमच्या मागे.*विभाग 2 – माउंटन ट्रेल टाईम ट्रेल*तारीख – 26 फेब्रुवारी 2023ठिकाण –  TJGMTRC प्रारंभ बिंदू (K2S मार्ग)*जंपिंग गोरिला माउंटन ट्रेल रन सिरीज इंडिया बद्दल*जंपिंग गोरिला माउंटन ट्रेल रन सिरीज इंडिया हा भारतातील एक आव्हानात्मक पर्वतीय प्रदेशात आयोजित केला जाणारा  प्रमुख ट्रेल रनिंग स्पर्धात्मक प्रकार आहे. जंपिंग गोरिल्ला माउंटन ट्रेल रन सिरीज इंडिया द्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमांना ITRA इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन द्वारे प्रमाणित केले जाते. जंपिंग गोरिला माउंटन ट्रेल रन च्या वतीने येत्या 25 जूनला कुसगाव खिंड, पुणे येथील निसर्गरम्य लोकलमध्ये द ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन 2023 चे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये 25 किमी, 50 किमी आणि 75 किमी विभागात पार पडेल.जंपिंग गोरिल्ला माउंटन ट्रेल रन सिरीज www.jumpinggorilla.comसंपर्क क्रमांक -+91 7030200104

Email – runwithitro@gmail.com

‘द जंपिंग गोरिल्ला’ पत्रकार परिषदेवेळी डावीकडून आदिनाथ नाईक, रवींद्र सराफ, जयगोविंद यादव