द इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया तर्फे विद्यार्थी व सदस्यांकरिता विविध उपक्रमाचे आयोजन
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने आपला 55 वा स्थापना दिवस नुकताच साजरा केला, ज्यात भारताच्या माननीय राष्ट्रपती, श्रीमती एम. द्रौपदी मुर्मू, आणि माननीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, श्रीमती. निर्मला सीतारामन सहभागी झाल्या होत्या. या माइलस्टोन इव्हेंटमध्ये कंपनी सचिव, उद्योग नेते, सरकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्व करणारे सुमारे ५०,००० लोक सहभागी झाले.
आयसीएसआय ने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे संरक्षण कर्मचारी, अग्निवीर आणि शहीदांच्या कुटुंबांसाठी फी माफ केली आहे. संस्थेनेही शहीदांच्या मुलींच्या शिक्षणासाठी 11,00,000/- रुपये संरक्षण मंत्रालय, भारत सरकारला दान केले आहेत.
आयसीएसआय ने आयसीएसआय मिडल ईस्ट (DIFC) NPIO च्या भागीदारीत दुबई, UAE येथे कॉर्पोरेट कर परिषद आयोजित केली, “UAE कॉर्पोरेट कर – पारदर्शकता आणि सुशासनाकडे एक नवीन प्रतिमान” या थीमवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
द इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया,(ICSI) ही संसदेच्या कंपनी सेक्रेटरीज कायदा, १९८० अंतर्गत स्थापन झालेली उच्च व्यावसायिक संस्था आहे. ही संस्था कंपनी सेक्रेटरी या व्यवसायाच्या विकासासाठी व नियम व कायद्यांच्या संरक्षणाचे कार्य करते. सीएस मनीष गुप्ता यांची प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सीएस मनीष गुप्ता यांनी माध्यमांशी बातचीत केली व इन्स्टिटयूटच्या महत्वाच्या उपलब्धी वयावर्षीच्या उपक्रमांविषयी चर्चा केली.
यावेळी बोलताना सीएस मनीष गुप्ता यांनी इन्स्टिट्यूटच्या उपलब्धी बद्दल माहिती दिली तसेच वर्षभरासाठी विद्यार्थी व सदस्यांसाठी असलेल्या योजना व उपक्रम यांची देखील माहिती दिली ते म्हणाले “२०२३ चे ध्येय ठेवून संस्थेने अभ्यासक्रमात बदल केला असून हा अभ्यासक्रम व्यावहारिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारा आहे.
इन्स्टिटयूटच्या उपलब्धी बद्दल बोलताना ते म्हणाले “द इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आपल्या ७१,००० सदस्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचले असून २ लाख ऑनरोल विद्यार्थी आहे.संस्थेने तक्रार निवारण कक्ष तयार केला आहे. ज्या मध्ये पोर्टल व कॉल सेंटरद्वारे येणाऱ्या तक्रारींचे निवारण केले जाईल ”
तसेच त्यांनी सांगितले की “आम्ही देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या मुलींसाठी पुढाकार घेतला आहे. ‘शहीद की बेटी’ उपक्रमाच्या अंतर्गत संस्थेने संस्थेच्या विविध कार्यक्रमांसाठी आमंत्रित मान्यवर / वक्ते यांनास्मृतीचिन्ह व इतर भेटवस्तू देणे बंद केले आहे. ह्या रक्कमेचा वापर शहिदांच्या मुलींच्या शिक्षणासाठी व कल्याणकारी योजनांसाठी केला जाणार आहे.संस्थेने ‘आयसीएसआय स्टुडंट्स एज्युकेशन फंड ट्रस्ट’ तयार केले आहे जी आर्थिकदृष्ट्या मागास आणि शैक्षणिकदृष्ट्या उज्ज्वल विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी कोर्सकरण्यास प्रोत्साहन देते.”
संस्थेने लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर-पूर्व राज्य, दमन, दीव आणि पुडुचेरी मध्ये अभ्यास केंद्र योजने अंतर्गत अभ्यास केंद्रांची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे संस्था शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यानमध्ये कंपनीसेक्रेटरीज विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सी एस ऑलीम्पियाड’ नावाचा अनोखा उपक्रम दरवर्षी राबवते.
