20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘द अक्षय परांजपे’ स्टुडिओचे दिमाखात उदघाटन

Share Post

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते ‘द अक्षय परांजपे स्टुडिओचे’ उदघाटन नुकतेच करण्यात पुण्यातील कोथरूड येथे लोकमान्य हाऊस या ठिकाणी हा स्टुडिओ आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते दिग्दर्शक श्रीरंग देशमुख, संगीतकार सलील कुलकर्णी, प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, दि. न्यू इंडिया एशुरन्स कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर रॉय, रिजनल मॅनेजर सुरेश कुमार, तसेच सिनिअर डिव्हीजनल मॅनेजर राजेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना गोखले म्हणाले, की विल्सन या दुर्मिळ आजाराने बाधित असलेल्या अक्षय परांजपे याने मोठ्या जिद्दीने विल्सन आजारावर मात करत छायाचित्रण व्यवसायाकडे आयुष्याचा मोर्चा वळवला व तो या क्षेत्राकडे तो करियर म्हणून काम करतोय. कोथरूड या ठिकाणी त्याने आई वडिलांच्या व बहिणीच्या मदतीने तो गरुडझेप घेतोय. एक उत्तम छायाचित्रकार म्हणून तो उदयास येतोय. त्याच करावं तेवढे कौतुक कमीच आहे.

श्रीरंग देशमुख म्हणाले, की अक्षयला मी खूप वर्षांपासून ओळखत आहे. मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने तो चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. शारीरिक व्यंगाचे कोणत्याही प्रकारचे भांडवल न करता मोठ्या जिद्दीने तो त्याच्यावर मात करत तो काम करतोय. त्याच्या जिद्दीचा आणि कष्टाचा करावं तेवढं कौतुक कमीच आहे.

सलील कुलकर्णी म्हणाले, की चित्रपट क्षेत्रामध्ये छायाचित्रकाराचे महत्व मोठे आहे. चित्रपट निर्मितीच्या वेळी छायाचित्रकार जी छायाचित्र तो काढत असतो. त्याचा मोठ्या प्रमाणात चित्रपटाच्या प्रसिद्धी वेळेस उपयोग होतो. अक्षय हा गुणी मुलगा असून त्याने सुरू केलेल्या कारकीर्दीला व त्याच्या पाठीशी मी नक्कीच उभा आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का पानसरे यांनी केले तर आभार अक्षय परांजपे यांनी मानले.