NEWS

देशी खेळांना देणार प्रोत्सहन” महाराष्ट्राच्या महाराजा अग्रसेन स्पोर्ट्स अकॅडमीचे नवनियुक्त राज्य संयोजक नितीन अग्रवाल यांचे आश्वासन

Share Post

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग यांनी पुण्यातील तरुण आणि हरहुन्नरी नितीन अग्रवाल यांची महाराजा अग्रसेन स्पोर्ट्स अकादमी महाराष्ट्राच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. या पदाचा स्वीकार करत नितीन अग्रवाल म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचे स्वप्न पाहिले आहे आणि आज कोविड सारख्या महामारीतून बाहेर पडताना आज प्रत्येकालाच खेळाचे आणि आरोग्याचे महत्व पटलेले आहे. या सगळ्याचा विचार करून महाराजा अग्रसेन स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात आणण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराजा स्पोर्ट्स अकॅडमी सर्वतोपरी प्रयत्नात असेल. महाराष्ट्रातल्या मतितातले कबड्डी, खो-खो, गिल्‍ली-दांडा, आट्या-पाट्या, कॅरम, दोरी उडी, तिरंदाजी, बॅडमिंटनवर अश्या या देशी खेळांवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. जेणेकरून या देशी खेळांकडे तरुणाई वळेल. अलीकडच्या काळात तरुणाई क्रिकेट आणि टेनिसकडे अधिक आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते आणि खेळाडूंना संधी मिळत नाही. त्यामुळे तरुणांचे लक्ष देशी खेळांकडे वळवावे लागेल. ज्यामुळे ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसोबतच आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून देशात नावलौकिक मिळवू शकतील.”

युवा आणि महिला खेळाडूंसाठी अकॅडमी पुरवेल सुविधा

महाराजा अग्रसेन अकॅडमी तर्फे सर्व खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जातील. जेणेकरून येथून पुढे आलेला प्रत्येक खेळाडू गाव, शहर आणि राज्याचे नेतृत्व करेल आणि भविष्यात देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असेल. या गुणवान खेळाडूंचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा विश्वात देशाचे नाव उंचावतील. आगामी काळात महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्ये या प्रकारची अकॅडमी उभारण्यात येणार आहे त्याच बरोबर खेळाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार उपलब्ध होईल.

खेळाडूंच्या सुविधा आणि प्रशिक्षणावर भर

नितीन अग्रवाल म्हणाले की, “या देशात खूप प्रतिभा दडलेली आहे. विशेषतः ग्रामीण भागात. पण गरज आहे ती ओळखण्याची. त्यांना ओळखणे, त्यांच्यासाठी सुविधा आणि प्रशिक्षण देणे. अशा कलागुणांचा शोध घेऊन त्यांच्या सुप्त गुणानं वाव देण्याचे काम हे अग्रसेन स्पोर्ट्स अकॅडमी करणार आहे त्याचबरोबर गरज पडल्यास त्यांना सुविधा देऊन प्रशिक्षणाची व्यवस्था करेल. अकॅडमीतर्फे शालेय स्तरावर अशा कलागुणांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून जास्तीत जास्त लोक खेळाकडे वळतील या कडे पाऊल उचलणार आहे.”

मोबाईल पासून नवीन पिढीला दूर ठेवणे

अग्रवाल यांनी सांगितले की, “आजची पिढी खेळापासून दूर असून मोबाईलमध्ये जास्त हरवून जाते. त्यावर व्हिडिओ गेम्स खेळतो. जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही विशेषतः तरुण मुलामुलींसाठी कारण याच वयात त्यांच्या शारीरिक हालचाली नाही झाल्या तर वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागेल अशा स्थितीत आजच्या तरुण पिढीला मोबाईलच्या व्यसनातून मुक्त करून पुन्हा क्रीडाविश्वात विशेषतः मैदानी खेळांकडे वळवायचे हे आमचे एक उधिष्ठ आहे. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास तर होतोच, शिवाय ते निरोगीही राहतात. वेळोवेळी अकॅडमी आपल्या क्रीडा धोरणाचाही आढावा घेईल.”असे आश्वासन अग्रवाल यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *