देशातील अग्रगण्य संस्थांन आय एस बी अँड एम ((ISB&M) कडून क्रेसेंडो २०२३
इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया (आयएसबी अँड एम) ने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील क्रेसेंडो २०२३ या आपल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन केले होते. १६ ते १८ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या वर्षीच्या क्रेसेंडोची थीम होती “ड्रिम, डेअर अॅण्ड डिलीव्हर ” ज्यात स्टेप अप (नृत्य स्पर्धा), बॅटल ऑफ बँड्स, रॅप बॅटल, पॉवर आवर (बॉडी शो) पेंटिंग कॉम्पिटीशन – रंग दे, यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचसोबत बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅकॅथॉन, टेकमेनिया आणि या सारखे बरेच खेळ देखील पहावयास मिळाले. क्रेसेंडो २०२३ चे मुख्य आकर्षण म्हणजे १८ मार्च रोजी आयव्ही लॉन्स, बाणेर येथे आयोजित करण्यात आलेली आर्टिस्ट प्रो नाईट, जिथे विख्यात कलाकार असीस कौर यांचा लाईव्ह पर्फॉर्मन्स पहावयास मिळाला. त्यांचा बुलंद आवाज आणि खास पर्फोर्मन्समुळे हा उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. आयएसबी अँड एम (ISB&M) बिझनेस मॅनेजमेंट आणि मीडिया स्टडीजसाठी देशातील अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, त्यांच्यात जबाबदारीची भावना आणि नैतिकतेची भावना वाढवणे हे त्यांच्ये मुख्य ध्येय आहे. विद्यार्थ्यांनी अणेक क्षेत्रांमध्ये यशस्वी व्हावे यासाठी शिक्षणातील उत्कृष्टटते मध्ये उच्च दर्जे राखणार्या आयएसबी अँड एम मध्ये त्यांना आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्यांचे धडे दिले जातात. क्रेसेंडो २०२३ मध्ये पुणे आणि मुंबईच्या आसपासच्या कॉलेजांमधील सुमारे ५५०० हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग पहावयास मिळाला. तिस-या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अणेक बॉलीवूड कलाकारांचा समावेश होता, यापूर्वी देखील येथे अनेक बॉलीवूड कलाकरांनी उपस्थित राहून क्रेसेंडोची शोभा वाढवली आहे जसे की अक्षय कुमार, लकी अली, विशाल- शेखर, स्ट्रिंग्स, आतिफ अस्लम, मोहित चौहान, सलीम-सुलेमान, नेहा कक्कर, सनम पुरी, झाकीर खान, आनंद भास्कर कलेक्टिव्ह आणि इतर देखील अनेक कलाकारांनी येथे परफ़ॉर्म केले आहे. विद्यार्थ्यांसाठी क्रेसेंडो २०२३ ही संगीत, संस्कृती आणि शिक्षणाचा उत्तम अनुभव घेण्याची एकअविश्वसनीय संधी होती. यावेळी डॉ. प्रमोद कुमार (अध्यक्ष- आयएसबी अँड एम ग्रुप) म्हणाले, क्रेसेंडो हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठीचा सक्रिय दृष्टीकोन आहे, आणि एक मोठा इंटरकॉलेज फेस्ट आहे याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा हातभार लागतो.