देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान मोठे – सौम्य रंजन पटनायक
स्प्रेड हॅपीनेस फाउंडेशनच्या वतीने “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व उत्कलमणी गोपबंधु दास पुरस्कार” समारंभ सोहळा मोठ्या दिमाखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे या ठिकाणी नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ओडिशा विधानसभेचे सदस्य सौम्य रंजन पटनायक, आमदार रवींद्र धंगेकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे भगवानराव वैराट, स्प्रेड हॅपीनेस फाउंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष सौम्या महापात्रो,
योगेश सूर्यवंशी, आनंद महापात्रा, तुषार मोहंता, सत्य दास, बैजयंती बारीक, श्रीकांत परिडा, अक्षय जेना, बिजया बेहरा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपून पुण्यात स्प्रेड हॅपीनेस फाउंडेशनच्या वतीने आम्ही अनेक वर्षांपासून पुण्यात पर्यावरणाचे संवर्धन, आरोग्य जनजागृती, रोजगार निर्मिती या क्षेत्रात कार्यरत आहेत. आगामी काळात आम्हाला अनेक सामाजिक कामे करणार आहोत. असे स्प्रेड हॅपीनेस फाउंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष सौम्या महापात्रो प्रास्ताविक प्रसंगी बोलत होते.
पटनायक म्हणाले की गोपबंधु दास आणि अण्णा भाऊ यांचे कार्य महान होते. दोघांचे ही साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णांनी शाहिरीतून चळवळ उभी केली. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. अशा महान व्यक्तींकडून आपण सर्वांनी आदर्श घेवून समाजहिताचे कार्य केले पाहिजे.
वैराट म्हणाले की स्प्रेड हॅपीनेस फाउंडेशनच्या वतीने “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व उत्कलमणी गोपबंधु दास पुरस्कार” देवून अनेकांचा गौरव करण्यात आला. यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. रशियामध्ये महाराष्ट्राची ओळख करून देताना अण्णांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला होता. साहित्य क्षेत्रात, संयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामात अण्णांचे योगदान मोठे आहे.
धंगेकर म्हणाले की समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, उद्योजक, समाजसुधारक यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पहार देवून गुणगौरव करण्यात आला. उडीसा आणि महाराष्ट्र येथील लोकनृत्य तसेच कथक, भरतनाट्यम्, मंगलाचरण, बिहू नृत्य या व्यासपीठावर पाहायला मिळाली. यातूनच दोन राज्यांच्या संस्कृती देवाणघेवाण होते.
कार्यक्रमाचे आभार काशिनाथ गायकवाड यांनी मानले तर
सूत्रसंचालन काशिनाथ गायकवाड व योगिनी बागडे यांनी केले.