NEWS

“दिवाळी फराळ आणि भेटवस्तू पाठवा थेट परदेशात”पुणे पोस्ट विभागाचा अनोखा उपक्रम..

Share Post

पुण्यातून परदेशात नोकरी निमित्त तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या अलीकडील काळात खूप वाढली आहे. प्रत्येकाला दिवाळी निमित्त भारतात येणे शक्य होत नाही.. दिवाळी निमित्त जगभरातील आपल्या प्रिय जनांना फराळ तसेच भेटवस्तू पाठवणे सोपे व्हावे यासाठी पुणे पोस्ट विभागाने सर्व पोस्ट ऑफिस मध्ये दिवाळी फराळ परदेशात पाठवण्याची सोय आपल्या international parcel सेवेद्वारे केली आहे. दर सुद्धा अत्यंत माफक आहेत व पुण्यातील महत्वाच्या पोस्ट ऑफिस मध्ये जसे की Pune GPO, Pune City Head post office,Chinchwad East, Market Yard, Shivajinagar,Parvati, Ganeshkhind,Model colony, yerwada Kothrud,Deccan ,Hadapsar येथे पॅकेजिंग ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे असे पुण्याचे पोस्टमास्टर जनरल श्री रामचंद्र जायभाये यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना श्री जायभाये यांनी सांगितले की आपल्या कामातून वेळ काढून पोस्टात येऊ शकत नसलेल्या लोकांसाठी पुणे पोस्ट विभागाने घरून pickup ची व्यवस्था आपल्या पोस्टमन द्वारे या काळात केली आहे आणि ती सुद्धा मोफत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना पोस्टाच्या या international पार्सल सेवेचा लाभ घेता येईल.

जास्तीत जास्त जनतेनी पोस्ट विभागाच्या दिवाळी निमित्त चालू केलेल्या ” दिवाळी फराळ परदेशात” या अनोख्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पुण्याचे पोस्टमास्टर जनरल श्री रामचंद्र जायभाये यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *