“दादा जे. पी. वासवानी” यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
वासवानी मिशनचे अध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण मा. श्री. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र, यांच्या हस्ते दि. 12.09.2023, मंगळवार रोजी साधू वासवानी मिशन, कॅम्प, पुणे येथे करण्यात आले. या वेळी मा. श्री. देवसिंह चौहान, केंद्रीय संचार राज्य मंत्री, भारत सरकार, मा. श्री शंकर लालवाणी, खासदार इंदोर, कु. कृष्णकुमारी धडाणी, कार्यकारी प्रमुख, साहू वासवानी मिशन, डॉ. बसंत अहुजा साधू वासवानी मिशन, मा. श्री. किशन कुमार शर्मा, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा सर्कल, मा. श्री. रामचंद्र जायभाये, पोस्ट मास्तर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे आणि कु. सिमरन कौर, निदेशिका डाक सेवा, पुणे क्षेत्र इ. उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. राज्यपाल आणि इतर प्रमुख पाहुण्यांनी साधू वासवानी यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर सर्वांनी साधू वासवानी यांच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या ‘दर्शन’ संग्रहालयास भेट दिली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमास साधू वासवानी मिशनचे अनुयायी, टपाल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमानंतर मा. श्री. देवसिंह चौहान, केंद्रीय संचार राज्यमंत्री, भारतसरकार यांनी पुणे मुख्य टपाल कार्यालयास (जी.पी.ओ.) भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी पुणे मुख्य टपाल कार्यालयातील विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित विभागांच्या कार्याची पाहणी केली व सामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. सदर भेटी दरम्यान मा. मंत्री महोदयांच्या हस्ते लहान मुली आणि महिलांना सुकन्या समृद्धी खाते आणि महिला सन्मान बचत खाते यांचे पासबुक वाटप देखील करण्यात आले. त्यांच्या हस्ते मृत विमाधारकाच्या नातेवाईकाना ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बँक’ (आई.पी.पी.बी.) मार्फत काढलेल्या 10 लाख रु. च्या अपघाती विम्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. भारतीय डाक विभाग आणि ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बँक’ (आई.पी.पी.बी.) मुळे सामान्य नागरिकांना विविध प्रकारचे बचत खाते आणि विमा संरक्षण उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे सामान्य नागरिक खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असल्याचे मनोगत मा. श्री. देवसिंह चौहान यांनी व्यक्त केले.
पुणे मुख्य टपाल कार्यालयास देण्यात आलेल्या भेटी दरम्यान मा. श्री. किशन कुमार शर्मा, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा सर्कल, मा. श्री. रामचंद्र जायभाये, पोस्टमास्तर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, कु. सिमरन कौर, निदेशिका डाकसेवा, पुणे डॉ. अभिजीत इचके, प्रवर अधीक्षक, पुणे शहर पूर्व विभाग, श्री. पी. इ. भोसले, वरिष्ठ पोस्ट मास्तर, पुणे मुख्य टपाल कार्यालय इ. अधिकारी उपस्थित होते.