23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

दक्षिणात्य निर्माता करणार बोहाडा चित्रपटाची निर्मिती

दक्षिणात्य निर्माता करणार बोहाडा चित्रपटाची निर्मिती

दक्षिणात्य निर्माता करणार बोहाडा चित्रपटाची निर्मिती

Share Post

वेगवेगळे मुखवटे धारण करत.. माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. आणि ह्या निसर्गाचा गौरव,भारतीय पुराणातील मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे “बोहाडा” दक्षिणात्य निर्माता करणार बोहाडा चित्रपटाची निर्मिती

२०२५ या वर्षात भेटीला येणाऱ्या बोहाड्या ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन ‘बोहाडा’ची निर्मिती करणार आहेत.

राहुल पाटील, कृतिका देवरूखकर सहनिर्मिती, विशाल देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अंबर हडप यांनी केले आहे. या चित्रपटात कोण कलाकार आहेत यांची माहीत सांगण्यात आली नाही.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, ” निसर्गाची आपल्यावर जी कृपा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. खंत या गोष्टीची आहे की, आतापर्यंत हा उत्सव लोकांना माहित नव्हता. हा परंपरागत उत्सव आहे, त्यामुळे या रूढी, परंपरा या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे.

चित्रपटाचा निसर्गाशी संबंधित असल्याने यात मजा, सस्पेन्स, थ्रिलर सगळ्यांचे मिश्रण असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव येणार आहे. वर्षात ५२ आठवडे असतात, ५२ सोंगेही असतात. परंतु याचा थांगपत्ता आपल्याला नसतो. हेच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या विषयाचे नावीन्यही अफाट आहे, महाराष्ट्राच्या जंगलात लपलेल्या संस्कृतीवर आधारीत चित्रपट करण्याचा मोह दाक्षिणात्य निर्मात्यांनाही आवरला नाहीये. मराठी विषयाला दाक्षिणात्य निर्माता पसंती दर्शवत आहेत.”

दक्षिणात्य निर्माता करणार बोहाडा चित्रपटाची निर्मिती
दक्षिणात्य निर्माता करणार बोहाडा चित्रपटाची निर्मिती