18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

“दक्षता जनजागृती सप्ताह 2023 निमित्त कार्यशाळेचे आयोजन- उप. पोलीस महानिरीक्षक, CBI पुणे आणि पोलीस अधीक्षक, ACB, पुणे यांनी केले डाक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन”

Share Post

 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जागरुकता सप्ताह 2023 निमित्ताने, पुणे शहर पूर्व डाक विभागातर्फे 3 नोव्हेंबर 2023 रोजी पदमजी हॉल, MCCIA, पुणे येथे टपाल कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधीर हिरेमठ (IPS), उप.  पोलीस महानिरीक्षक, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) पुणे आणि मुख्य वक्ते, श्री अमोल तांबे (IPS), पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), पुणे यांची उपस्थिती लाभली .

 पुणे शहर पूर्व टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर,  श्री अभिजित इचके यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे स्वागत केले.  प्रमुख पाहुणे श्री सुधीर हिरेमठ यांनी सीबीआयची कार्यपद्धती, यंत्रणा आणि दक्षतेची भूमिका याविषयी सादरीकरण केले.  प्रमुख वक्ते, श्री अमोल तांबे (IPS) यांनी पोलीस विभागातील त्यांचा अनुभव आणि ACB द्वारे राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली.  दोन्ही अधिकाऱ्यांनी दक्षतेबाबत  तसेच भ्रष्टाचारविरोधात एकत्रित पणे काम करण्याबद्दल श्रोत्यांना मार्गदर्शन केले.

 पुणे विभागातील 150 हून अधिक टपाल कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या संधीचा लाभ घेत कार्यशाळेला हजेरी लावली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी पुणे विभागातर्फे सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.