‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न
‘ढिशक्यांव’ चित्रपटाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. अशातच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता ताणायला सज्ज झाला आहे. नुकताच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला. ‘शिवाय एंटरटेनमेंट’ आणि ‘राठोड एंटरटेनमेंट’ यांनी ’18 डिग्री’ येथे झालेल्या या सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी स्विकारली. निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील निर्मित तर ‘फिल्मस्त्र स्टुडिओ’ आणि ‘झटपट फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट येत्या १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.’ढिशक्यांव’ चित्रपटाच्या नुकत्याच झालेल्या ट्रेलर अनावरण सोहळ्याला चित्रपटातील सर्वच कलाकारांनी चारचाँद लावले. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रथमेश परब आणि लातूरच्या अहेमद देशमुखने चित्रपटात चांगलाच कल्ला केलेला दिसतोय. दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट असून निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. ‘फिल्मस्त्र स्टुडिओ’ आणि ‘झटपट फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ढिशक्यांव’ चित्रपट असून चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवादाची धुरा लेखक संजय नवगिरे यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. प्रथमेश परब सोबत या चित्रपटात संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता संदीप पाठक आणि सुरेश विश्वकर्मा यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. सुरेशजींनी कमाल व्यक्तिरेखा साकारत चित्रपटाची शोभा वाढवलीय.’ढिशक्यांव’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अल्पावधीतच साऱ्या मायबाप प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल यांत शंकाच नाही. तर येत्या १० फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर आवर्जून तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा ही विनंती.
![](https://www.smartpunekarnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230129-WA0087-1024x682.jpg)