18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

डोकेदुखी ब्रेन ट्यूमरचे पहिले लक्षण आहे का ?

Share Post

अनेक लोकांमध्ये डोकेदुखी ही एक सामान्य समस्या असून यामागे टेन्शन, तणाव, सायनसच्या समस्या, मायग्रेन्स किंवा अन्य वैद्यकीय कारणांसह अनेक घटकांचा समावेश आहे.  पण, जर हीच लक्षणे सातत्याने होऊ लागती तर अशा वेळी ब्रेन ट्यूमर सह अनेक मोठ्या आरोग्य समस्या असण्याचीही शक्यता असते.  पुण्यातील खराडी येथील मणिपाल हॉस्पिटल चे सल्लागार न्यूरोसर्जरी, डॉ. प्रवीण सुरवशे, यांच्या मते “ ब्रेन ट्यूमर्स म्हणजे तुमच्या मेंदू मध्ये होणारी अनैसर्गिक वाढ किंवा तयार होणारा पेशींचा समूह असतो.  यामध्ये मेंदूच्या पेशीच वाढू लागतात किंवा मेंदूतील एका भागातील पेशी पसरत त्या शरीरातील दुसर्‍या भागात वाढू लागतात.”

जरी डोकेदूखी हे कारण मेंदूच्या कॅन्सरचे ही सर्वसाधारण लक्षण असले तरीही ते नेहमीच प्राथमिक लक्षण नसते.  डॉ. प्रवीण यांनी पुढे अधोरेखित केले की ब्रेन ट्यूमरच्या केसेस मध्ये डोकेदुखी बरोबरच ट्यूमरचा आकार आणि त्याच्या स्थानानुसार अन्य लक्षणेही समोर येत असतात.  जर कालानुरुप यावर उपचार केले गेले नाहीत तर या ट्यूमर मुळे अनेक समस्या निर्माण होतात जसे कायमस्वरुपी न्युरोलॉजिकल नुकसान होऊ शकते, उदा.  बोलण्यामध्ये अडचणी येणे आणि स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होऊ लागतात.

सर्वसाधारण लक्षणांमध्ये डोकेदुखी, आकडी येणे, दिसण्यातील समस्या जसे अंधुक दिसणे किंवा दोन गोष्ट दिसणे याच बरोबर बोलतांना समस्या निर्माण होणे  आणि समन्वयाचा अभाव असणे अशा गोष्टींचा समावेश असतो.  जर एखाद्या व्यक्तीला डोकेदुखी किंवा अन्य असामान्य लक्षणे जसे आकडी येणे दृष्यमानता बदलणे अशी लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीने लगेच वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.  ब्रेन ट्यूमरचा शोध घेण्यासाठी लवकर निदान होणे आवश्यक असून लवकर उपचार केल्यास बरे होण्याची शक्यता वाढते.

काही केसेस मध्ये ब्रेन ट्यूमर्स मुळे हॉर्मोन्स मध्ये असमतोल निर्माण होते परिणामी वजन वाढणे/कमी होणे यामुळे महिलांच्या मासिक पाळीच्या ही समस्या निर्माण होऊ शकतात.  म्हणूनच हे समजून घेणे आवश्यक आहे की ही लक्षणे केवळ ब्रेन ट्युमरचीच नसतात तर यामुळे अन्य वैद्यकीय समस्याही निर्माण होऊ लागतात.

डॉ. प्रवीण यांनी पुढे नमूद केले की जर कोणाला रोजच्या जीवनात ही लक्षणे सातत्याने दिसून येत असल्यास तुम्हाला डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घेण्याची गरज आहे, हे डॉक्टर्स तुम्हाला एमआरआय स्कॅन सारख्या पुढील तपासण्यांचा सल्ला देतील. लवकरात लवकर निदान झाल्यास चांगले उपचार प्राप्त होतात.

ब्रेन ट्यूमर जर शक्य असेल तर सर्जरी करावी लागते, जर कॅन्सर असेल तर केमोथेरपीची औषधे देऊन कॅन्सरच्या पेशी मारता येतात, रेडिएशन थेरपी मध्ये उच्च उर्जेने युक्त किरणांचा वापर करुन कॅन्सरच्या पेशी नष्ट केल्या जातात आणि त्याच बरोबर अन्य उपचारांसह टार्गेटेड ड्रग ट्रिटमेंट सारखेही उपचार करणे शक्य होते.