डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
डॉक्टर्स दिनाच्या निमित्त्याने येत्या शनिवारी, दि. १ जुलै रोजी पुण्यातील मेरी सहेली संस्थेच्या वतीने सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरच्या जवळ, युस्टेल लक्झरी जैन गर्ल्स हॉस्टेल येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून १३ ऑगस्ट रोजी आयोजित आरोग्य तपासणी शिबिर सर्वांसाठी खुले असल्याची माहिती तन्ना यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी डॉ. हर्षिदा चांदवानिया, डॉ. ख्याती छोथानी तन्ना, डॉ. स्मिता घुले व डॉ. प्राजक्ता शहा उपस्थित होत्या.
शिबिर मधे डॉ. ख्याती छोथानी तन्ना या महिलांना विविध विकारांवर होमिओपॅथीद्वारे उपचार, भूलतज्ञ डॉ. हर्षिदा चांदवानिया या माईंड पॉवर ट्रेनर असून त्या मानसिक शक्ती आणि अवचेतनता द्वारे सशक्त आरोग्य, दंतवैद्य डॉ. प्राजक्ता शहा तोंड व दातांचे आरोग्य, फिजिओथेरपिस्ट डॉ. चिन्मयी येवलेकर सराफ रजोनिवृत्तीचा काळ व स्तनांच्या कर्करोगा विषयी जागरूकता, स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्मिता घुले निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदाचे महत्व, आहारतज्ञ डॉ. हेती शहा वजन आणि मधुमेह नियंत्रण या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
मेरी सहेली च्या संस्थापिका देवी तन्ना यांनी महिला सक्षमीकरणासाठी उभारलेल्या बरकत या व्यासपीठांतर्गत हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.