डायरी ऑफ विनायक पंडित : २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये मयूर पवार आणि कुणाल वेदपाठक यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक पुरस्कार !
एका कलाकाराचे भावविश्व साकारणारी फिल्म डायरी ऑफ विनायक पंडित, या सिनेमाला २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डायरी ऑफ विनायक पंडित या सिनेमासाठी प्रोडक्शन डिझायनर म्हणून मयूर पवार व आर्ट डिरेक्टर म्हणून कुणाल वेदपाठक यांनी काम पाहिले.चित्रबोली क्रिएशन्स आणि वन कॅम प्रोडक्शन्स यांची संयुक्त निर्मिती असलेला आणि मयूर शाम करंबळीकर दिग्दर्शित डायरी ऑफ विनायक पंडित हा चित्रपट २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फेस्टिवल साठी जगभरातून पाठवण्यात आलेल्या १५७४ सिनेमांमधून अंतिम 14 मध्ये निवडण्यात आला होता आणि मराठी स्पर्धात्मक विभागामध्ये अंतिम साथ मध्ये निवडण्यात आला होता.आपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे कथेचा नायक म्हणजे विनायक पंडित आपले आयुष्य संपवण्यासाठी निघतो. जसे दिवस पुढे जातात तसे विनायकला एक नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळते. आणि याच प्रवासामध्ये विनायक एक नवीन भावविश्व बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळते.चित्रपटात विनायक आपले स्वतःचे अनुभव जसे की नातेसंबंध,वादविवाद त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तिरेखा जसे की छोटी वर्षा जगदाळे सर आणि इतर हे सर्व विनायक पंडित आपल्या डायरीमध्ये उतरवत असतात. फिल्म ही पूर्ण विनायक पंडित याच्या डायरी भोवती फिरते आणि त्याला आलेले अनुभव हे प्रेक्षकांसमोर सादर करते.चित्रपटामध्ये मुख्य कलाकार म्हणून अविनाश खेडेकर सुहास शिरसाट पायल जाधव आणि स्वाती काळे यांनी काम केले आहे. तर संगीतकार म्हणून निरंजन पेडगावकर आणि आनंदी विकास यांनी काम केले आहे. डायरी ऑफ विनायक पंडित मधीलगाण्यांना पद्मश्री शंकर महादेवन अभय जोधपुरकर मंगेश बोरगावकर जयदीप वैद्य आणि प्रियांका बर्वे यांनी स्वरसाज चढवला आहे.उत्तम दिग्दर्शन, सर्व कलाकारांचे दमदार प्रदर्शन उत्तम संगीत याच सोबत उत्तम निर्मिती याची धुरा आदित्य देशमुख आणि वेदांत मुगळीकर यांनी केली तर सहनिर्माते म्हणून ऋषिकेश जोशी व्यंकट मुळजकर विनय देशमुख आणि समीर सेनापती यांनी काम पाहिले.3 फेब्रुवारी 2023 आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडलेल्या डायरी ऑफ विनायक पंडित च्या स्क्रिनिंग ला रसिकांचा सर्वोत्कृष्ट प्रतिसाद लाभला जवळपास 500 हून अधिक लोकांनी हा सिनेमा पाहिला.21व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये गौरवलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.