NEWS

डाबर विटा-इंडियाज कम्पलीट हेल्थ ड्रिंक” कडुन खेळाडूंसाठी आरोग्य सत्राचे आयोजन

Share Post

भावी पिढीच्या सुरक्षीत आरोग्यासाठी वचनबद्ध हाऊस ऑफ डाबरच्या “डाबर विटा, कम्पलीट हेल्थ फूड ड्रिंक” ने एक मेगा हेल्थ अवेअरनेस कॅम्पेन सुरू केले आहे. खेळाडूंचे उत्तम पाचन, श्वसनासंबंधित, आरोग्य, हाडे आणि स्नायूंची मजबूती, शक्ती आणि चांगली रोगप्रतिकार क्षमता यांसारख्या 7 महत्त्वाच्या आरोग्यविषयक गरजांना प्रोत्साहन देण्याच्या उद्येश्याने या आरोग्य सत्राचे आयोजन केले . या सत्रामध्ये ३०० हून अधिक खेळाडूंचा समावेश असलेल्या विशेष सत्रासह पुण्यात या मोहिमेची सुरवात झाली आहे. याचबरोबर खेळाडूंना डाबरकडून खास हेल्थ किटही देण्यात आली.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना दिनेश कुमार, (मॅनेजर-कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, डाबर इंडिया लि) म्हणाले, “आजच्या खेळाडूंना अभ्यासात, खेळात आणि एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवायचे असते, त्यामुळे त्यांच्या योग्य वाढीसाठी आणि संपुर्ण विकासासाठी त्यांना संतुलित आणि पौष्टिक आहाराची खुप आवश्यकता असते. एक कम्पलीट हेल्थ ड्रिंक आवश्यक विटामीन्स, मिनिरल्स , न्युट्रिशियन्स प्रदान करू शकते जे कदाचीत त्यांना नियमित आहारातून मिळत नाहीत. डाबर विटा हे एक असे हेल्थ ड्रिंक आहे जे खेळाडूंच्या वाढीत आणि विकासात मदत करते आणि त्यांना आवश्यक पोषन प्रदान करते. डॉ. परमेश्वर अरोरा याबद्दल भाष्य करताना म्हणाले की. “फळे, भाज्या, होल ग्रेन्स यांचा समावेश असलेला संतुलित आहार, तसेच उत्तम हेल्थ ड्रिंक खेळाडूंच्या सर्वांगीण, शारीरिक आणि मानसिक विकासास मदत करते. शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स पोषकतत्वे तसेच फायटोन्यूट्रिएंट्स किंवा वनस्पती व नैसर्गिक पदार्थांमधुन मिळणारे पोषन आवश्यक असते, जे त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी मदत करतात. जसे की आवळा आणि अश्वगंधा यांसारख्या औषधी विशिष्ट रोगांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक कार्ये करतात, ब्राह्मी आणि शंखपुष्पी शिकण्याची एकाग्रता वाढवण्यात मदत करते, द्राक्षा अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते व रोज तुमच्या शरीरातील पेशींच्या होणाऱ्या नुकसान पासून संरक्षण देते.यावेळी डाबर इंडियाचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन व्यवस्थापक दिनेश कुमार , डॉ. परमेश्वर अरोरा, डॉ. अब्दुल कलाम ई – लर्निग स्कूल च्या संस्थापिका सौ. लक्ष्मीताई दुधाने यांच्यासोबतच पंडित जाधव,उदय पवार, शिवानी गरुड आदी प्रमुख पाहुणे देखील उपस्थित होते. १३८ वर्षांच्या समुद्ध अनुभवाचा वारसा असलेल्या डाबर ने आपल्या दर्जेदार उत्पादनांद्वारे त्यांच्यावरील विश्वास दिवसेंदिवस अधिक मजबूत केला आहे. डाबर विटामध्ये अश्वगंधा, गिलॉय, ब्राह्मी आणि शंकपुष्पी इत्यादी ३० हून अधिक आयुर्वेदिक बूस्टर्सचा योग्य समावेश आहे, या आयुर्वेदाक आणि टेस्टी चॉकलेट ड्रिंक मधुन आरोग्याचे कित्येक फायदे मिळतात. शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, ताकद-शक्ती, हाडे आणि स्नायूंची मजबूती आणि पाचन व श्‍वसनाचे आरोग्य ह्या मुलांच्या योग्य वाढीत मदत करणार्या सात महत्त्वाच्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी हे सर्वसमावेशक असे हेल्थ ड्रिंक तयार करण्यात आले आहे.” “ खेळाडूंच्या सर्वांगीण विकास, पोषक आहाराचे महत्व याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, डाबर विटा ने भारतातील २० शहरांतील आघाडीच्या स्पोर्ट अॅकॉडमी /शाळांसोबत हातमिळवणी केली आहे. या मोहिमेद्वारे शरीरासाठी, मेंदूच्या विकासासाठी आणि मजबूत हाडांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आहार आणि पौष्टिक पदार्थांबद्दल मुलांना शिक्षित करण्याचा आमचा मानस आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मजबूत प्रतिकारशक्तीवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच शारीरिक क्षमता, आणि खेळाडूंची योग्य वाढ कायम राखणे खूप महत्वाचे आहे” असेही कुमार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *