डाबर च्यवनप्राशने तुमची प्रतिकारशक्ती वाढवा आणि हिवाळ्याचा आनंद घ्या.
हिवाळा कोणाला आवडत नाही, पण या हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि श्वसनाचे आजार उद्भवतात तेव्हा थंडीची मजाच उरते. सामान्यत: तापमान आणि बदलत्या हवामानामुळे माणसाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे आजार होतात. अशा परिस्थितीत, हजारो वर्षांपासून प्रसिद्ध असलेले आणि लाखो लोकांनी यशस्वीरित्या प्रयोग केलेले आयुर्वेदिक उत्पादन च्यवनप्रास खूप दिलासा देते.
डाबर च्यवनप्राशचे सेवन केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढवून या ऋतूत वारंवार होणाऱ्या खोकला आणि सर्दी यांसारख्या आजारांपासून तर आपले संरक्षण होतेच शिवाय आपल्या शरीरातील अनेक अवयवांचे कार्य सुधारून शरीर मजबूत होते.
डाबरच्या प्रमुख आरोग्य सेवा ब्रँड डाबर च्यवनप्राशने आज देशभरातील वंचित मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने एक मेगा जागरूकता उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत, डाबर च्यवनप्राश, MD (A.Y.) BHU वाराणसी, डॉ. परमेश्वर अरोरा यांच्या सहकार्याने बदलणारे हवामान, सामान्य जीवाणू आणि विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची गरज मुलांना शिकवण्यासाठी एकत्र आले आहे. ह्यांची माहिती देण्यासाठी पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशाला, आपटे रोड इथे 250 हून अधिक मुलांसाठी एका विशेष सत्राचे आयोजन करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी मुलांमध्ये जागृती निर्माण करणे हा या सत्राचा उद्देश होता. मूलभूत स्वच्छता आणि पौष्टिक आहाराद्वारे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे मार्गही मुलांना शिकवले गेले.
ह्या वेळी शाळेच्या प्राचार्य सौ. मेधा सिन्नरकर आणि इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री दिनेश कुमार मॅनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन, डाबर इंडिया लि. म्हणाले की, डाबर च्यवनप्राश प्रत्येक भारतीयाला 100 वर्षांहून अधिक मजबूत प्रतिकारशक्ती प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा उपक्रम या बांधिलकीच्या दिशेने एक झेप आहे. दरवर्षी अनेकांचा बळी घेणार्या शीत लहरी बद्दल आम्ही चिंतित आहोत. या उपक्रमाद्वारे आम्ही वंचित मुलांना च्यवनप्राश देण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्तीचे महत्त्व अधोरेखित करून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत.