टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे ‘शेल्टर फॉर ऑल’ – कलर कोटेड स्टील उद्योगक्षेत्रातील अनोखे, उद्देशाने प्रेरित व्हिजन
कलर कोटेड स्टील उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने पुण्यातील ‘प्रारंभ’ कार्यक्रमात आपल्या ‘शेल्टर फॉर ऑल’ उपक्रमाचा शुभारंभ केला. कंपनीने दयाशील कॉर्पोरेट दायित्वाच्या दिशेने हे परिवर्तनात्मक पाऊल उचलले आहे.
‘शेल्टर फॉर ऑल’ हा टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या व्यवसाय धोरणाचा एक अविभाज्य भाग असून विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून, त्यापासून प्रेरणा घेऊन चालवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या युगाची ही सुरुवात आहे. पारंपरिक कॉर्पोरेट उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या व्हिजनसह सुरु करण्यात आलेला हा उपक्रम मानवी जीवन, वस्तू, प्राण्यांसाठी निवारा आणि शेती उत्पादनांची साठवण यासारख्या विविध विभागांमध्ये पर्यावरणपूरक, शाश्वत उपाययोजना निर्माण करण्याची कंपनीची वचनबद्धता दर्शवतो. दयाशीलता या मूलभूत मूल्यातून निर्माण करण्यात आलेला ‘शेल्टर फॉर ऑल’ उपक्रम टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलची जगावर लक्षणीय, मूर्त प्रभाव निर्माण करण्याची, उत्पादन प्रमोशनच्या पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन काम करण्याची बांधिलकी दर्शवतो.
टाटाब्ल्यूस्कोपस्टीलचेमॅनेजिंगडायरेक्टरश्रीअनूपकुमारत्रिवेदी यांनी सांगितले, “टाटाब्ल्यूस्कोपस्टीलमध्येआमचीबांधिलकीश्रेणीतीलसर्वोत्तमकोटेडस्टीलपुरवण्याच्यापुरतीमर्यादितनाही. ‘शेल्टरफॉरऑल‘मध्येआम्हीलोकांच्याजीवनातसुधारणाघडवूनआणूनआणिनिवारावघरासंबंधीच्यागंभीरसमस्यांबाबतजागरूकतानिर्माणकरूइच्छितो.”
त्यांनी पुढे सांगितले, “शेल्टरफॉरऑलएकअशीसंकल्पनाआहेज्यामध्येसजीववनिर्जीवसर्वांनानिवारापुरवण्याचासमावेशआहे. प्राण्यांसाठीनिवारा, विमानांसाठीहँगर्स, जहाजांसाठीडॉककिंवाइतरसुविधा, मेट्रोस्टेशन्सआणिसमाजाच्याइतरगरजा, थोडक्यातसांगायचेझाल्याससर्वांसाठीनिवारापुरवण्याचेउद्दिष्टघेऊनआमचाहानवीनउपक्रमसुरुकरण्यातआलाआहे. याउपक्रमाच्यामाध्यमातूनआम्हीनवभारताच्याअमृतकाळाचाएकभागबनूइच्छितो. शेल्टरफॉरऑलमध्येगरजूंनाभौतिकतसेचभावनिकपाठिंबापुरवण्याचेआमचेलक्ष्यआहे. हेवचनपूर्णकरण्यासाठीआमच्यासर्वहितधारकांनीयोग्यतीपावलेउचलावीतअसेआवाहनमीयानिमित्तानेकरतआहे.”
या कार्यक्रमात अनेक मान्यवर वक्ते सहभागी झाले होते, त्यापैकी प्रत्येकाने शाश्वत विकास आणि समुदाय उन्नतीच्या संकल्पनेचे आपले अनोखे दृष्टीकोन मांडले. पद्मश्री आणि भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी अडीअडचणींवर मात करून विजय मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची गाथा सर्वांना सांगितली. आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्याचा त्यांचा प्रवास आणि मजबूत, विश्वसनीय निवाऱ्यासाठी लोकांची सततची धडपड यातील साम्य त्यांच्या भाषणाने दाखवून दिली, चिकाटी व समुदायाच्या पाठिंब्याची शक्ती अधोरेखित केली. महा-मेट्रोचे डायरेक्टर ऑपरेशन्स अतुल गाडगीळ यांनी परवडण्याजोगी घरे आणि शहरी विकास यातील महत्त्वपूर्ण संबंध समजावून सांगितले. पुणे मेट्रोचे उदाहरण देत त्यांनी प्रमुख शहरी प्रकल्पांमध्ये शाश्वत व सहज उपलब्ध होतील अशा गृह उपाययोजनांना सामावून घेणे महत्त्वाचे असल्याच्या मुद्द्यावर भर दिला. पुण्यातील चैतन्य महिला मंडळामार्फत सामाजिक कार्य करणाऱ्या ज्योती पठानिया यांनी गृह सुविधांच्या सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला. वंचित वर्गातील महिला आणि मुलांना पाठिंबा पुरवण्यासाठी सरकारमार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना चालना देण्यात स्वयंसेवी संघटना निभावत असलेल्या भूमिकेबद्दल त्या बोलल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विविध समित्यांवर काम केलेले आणि अनेक कॉर्पोरेट संघटनांसाठी चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून कार्यरत अजित रानडे यांनी भारताच्या प्रगतीबद्दल माहिती दिली आणि अर्थव्यवस्थेबाबत आपली वैयक्तिक मते मांडली.
इन्कम टॅक्स कमिशनर संग्राम गायकवाड यांनी भारताच्या विकसित आर्थिक परिदृश्याचा सखोल आढावा घेतला. ते म्हणाले, “मजबूत आणि सर्वसमावेशक भविष्याकडे घेऊन जाणारा भारताचा मार्ग सूक्ष्म आर्थिक घटकांशी जोडलेला आहे. या संदर्भात शेल्टर फॉर ऑलसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत. हे उपक्रम सूक्ष्म स्तरावर रोजगार निर्माण करून औद्योगिक विकासाला चालना देतात, तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन आर्थिक क्रियाकलापांना चालना देतात. सूक्ष्म स्तरावर जीवनमान सुधारून, शाश्वत उपजीविका प्रदान करून, भारताला स्वावलंबी बनवण्याच्या आमच्या व्यापक उद्दिष्टांची पूर्तता करून जीवन गुणवत्तेवर थेट प्रभाव निर्माण करतात.” वक्त्यांच्या या भाषणांमुळे कार्यक्रमात अधिक समृद्ध संवाद घडून आला व शेल्टर फॉर ऑल ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्याच्या आड येऊ शकतील अशी आव्हाने व त्यावरील संभाव्य उपायांवर सूक्ष्म व व्यापक दृष्टिकोन प्रदान करण्यात आला.
कोटेड स्टील उद्योग आणि यामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने ‘टाब्ल्यूझटॉक’ हे विशेष न्यूजलेटर सुरु करत असल्याची देखील घोषणा टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने यावेळी केली. ‘प्रारंभ’ अनावरण करण्यात आलेल्या या न्यूजलेटरचा उद्देश या क्षेत्राचा ज्ञानसाठा समृद्ध करून, या विषयातील तज्ञांना व उद्योगक्षेत्रातील दिग्गजांना आपले मते व अनुभव सर्वांसमोर मांडण्यासाठी एकत्र आणणे हा आहे. ‘प्रोजेक्ट विस्तार’अंतर्गत उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये टाटा ब्लूस्कोप स्टीलने केलेला व्यवसाय विस्तार आणि त्यांच्या प्रमुख ब्रँड COLORBOND® च्या २५ वर्षांचा सोहळा, कंपनीची व्यावसायिक उद्दिष्टे सामुदायिक उन्नतीशी कशी जुळतात याचे उदाहरण प्रस्तुत करतात. या विस्तार धोरणामध्ये बाजारपेठांच्या नेमक्या गरजांनुसार उच्च दर्जाची कलर कोटेड छप्परे आणि क्लॅडिंग सोल्यूशन्स उपलब्ध करवून देण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. क्षेत्रीय विकासाप्रती टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलची धोरणात्मक वचनबद्धता यामधून दर्शवली जाते. या क्षेत्रांतील कंपनीची वाढ केवळ बाजारपेठेतील उपस्थिती मजबूत करत नाही तर स्थानिक अर्थव्यवस्था आणि समुदायांना देखील समर्थन देते.
नेटवर्क विस्तारामुळे ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने घराजवळ उपलब्ध होतील आणि लहान उद्योग, संबंधित सेवा तसेच रोजगाराच्या संधी वाढतील. ही वाढ टाटा ब्लूस्कोप स्टीलच्या ‘#ShelterforAll’ च्या जीवनात उन्नती घडवून आणण्याच्या, समुदायांना समर्थन देण्याच्या आणि जगात कायमस्वरूपी आणि सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या व्हिजनशी अनुरूप आहे.