20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर प्रकाशित

Share Post

झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतिक्षीत ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने यातील इतर कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे. आज समाजमाध्यमावर (सोशल मीडियावर) या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित करण्यात आले असून त्यातून आणखी एका दमदार अभिनेत्याचा तेवढ्याच दमदार भूमिकेतला लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. हा अभिनेता म्हणजे मराठी – हिंदी चित्रपटांत आणि वेबसिरीजमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा शरद केळकर. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात शरद केळकर बाजीप्रभू देशपांडेंची करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट झी स्टुडियोजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

यावर्षी तर ‘हर हर महादेव’ हा विशेष नजराणा त्यांनी प्रेक्षकांसाठी आणला आहे. याशिवाय केवळ मराठीतच नाही तर हिंदी, तामिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधूनही हा चित्रपट एकाच दिवशी भारतभर प्रदर्शित होणार असल्याने हा चित्रपट तमाम भारतीयांसाठी दिवाळीची विशेष भेट ठरणार आहे.