जॉर्ज इंस्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाइन इन्स्टिटयूट पुण्यात सुरु
जॉर्ज टेलीग्राफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट समुहाच्या ‘जॉर्ज इंस्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाइन’ (जीआयआयडी) या इन्स्टिटयूटचे उद्घाटन नुकतेच पुण्यात झाले. हे उद्घाटन भारती विदयापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका व कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डाॅ. अस्मिता जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी अभिनेते मिलिंद गुणाजी व अभिनेत्री मंजिरी फडणीस, द जॉर्ज टेलिग्राफ ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सुब्रत दत्ता, जीआयआयडी पुणेच्या संस्थापिका डॉ. संगीता रॉय चौधरी, सह संस्थापक डॉ. मिलिंद नाडकर्णी उपस्थित हाेते.
डॉ. संगीता रॉय चौधरी म्हणाल्या की, जीआयआयडीमध्ये विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती प्रज्वलित करून केवळ आकार न देता त्यांना आयुष्यभरासाठी प्लेसमेंटचे सहाय्य देखील प्रदान करतो. विद्यार्थ्यांच्या चांगल्या शैक्षणिक अनुभवासाठी खास डिझाइन केलेले इंटिरियर असण्याबरोबर, संगणक प्रयोगशाळा आणि सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत. राेजगारक्षम विद्यार्थ्यांच्या करिअरला आकार देणे व त्यांचे जीवन बदलण्याचे कार्य जीआयआयडी सन १९२० पासून करत आहे.
सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद नाडकर्णी म्हणाले की, इंटिरियर डिझाइनच्या आधुनिक शिकवण्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणारी आणि पुस्तकी ज्ञानावर नाही तर विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून पुण्यात या संस्थेची निर्मिती केली. इंटिरियर डिझाइनच्या व्यवसायात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व ज्ञान विद्यार्थ्यांना या इन्स्टिट्यूटमध्ये मिळणार आहे.
जॉर्ज टेलीग्राफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही या समूहाची मूळ संस्था आहे. जीटीटीआय ही आयएसओ 9001: 2015 प्रमाणित नोंदणीकृत विश्वस्त संस्था आहे. ही संस्था सन १९२० पासून नोकरी व रोजगारासाठी लागणारे कौशल्ये विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेचे अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) द्वारे मान्यताप्राप्त आहेत. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत हे येतात. काळानुरूप आवशक असणा-या उद्योगांच्या गरजेनुसार या संस्थेने नव नवीन अभ्यासक्रम तयार केले आहेत. सन १९२० मध्ये सियालदह, कोलकाता येथील जीटीटीआय च्या एका युनिटची आज भारतातील पूर्वेकडील राज्यांमध्ये ७० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे आणि २५ हजार विद्यार्थी आहेत. जॉर्ज इंस्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाइन हे जॉर्ज टेलीग्राफ ग्रुपचे एक नवीन इनिशिएटिव्ह आहे आणि त्याचे मुख्य केंद्र कोलकाता पार्क स्ट्रीट येथे आहे.